Vande bharat sleeper train Saam
देश विदेश

आनंदाची बातमी! वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रवाशांच्या सेवेसाठी तयार, कधीपासून धावणार?

Vande bharat sleeper train: रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी. वंदे भारत स्लीपर ट्रेन लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी लवकरच उपलब्ध होणार.

Bhagyashree Kamble

  • लांबच्या पल्ल्यासाठी वंदे भारत स्लीपर ट्रेन.

  • पुढील आठवड्यात पहिल्या कोचचे डिझाइन सादर होणार.

  • प्रवाशांना हाय स्पीड, आरामदायक आणि प्रीमियम सुविधा मिळणार.

भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी. वंदे भारतला मिळालेल्या उत्सफूर्त प्रतिसादानंतर स्लीपर ट्रेनही लवकरच प्रवाशांसाठी रूजू होणार आहे. इंडो - रशियन जॉइंट व्हेंचर 'काइनेट रेल्वे सॉल्यूशन्स' पुढील आठवड्यात पहिल्या कोचचे डिझाइन जाहीर करणार आहे. प्रथम याचे डिझाइन इंटरनॅशनल रेल्वे इक्विपमेंट एग्झिबिशन (IREE 2025)मध्ये प्रदर्शित केले जाईल. जे पुढील आठवड्यात दिल्लीतील भारत मंडपम येथील आयोजित कार्यक्रमात सादर केले जाईल.

काईनेट रेल्वे सॉल्यूशन्स ही भारतीय रेल विकास निगम लिमिटेड आणि आघाडीच्या रशियन रोलिंग स्टॉक कंपन्यांनी स्थापन केलेली संयुक्त कंपनी आहे. या भागीदाराअंतर्गत, कंपनीला १२० वंदे भारत स्लीपर ट्रेन (म्हणजेच १,९२०) कोच तयार करण्याची आणि देखभाल करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही कंपनी सध्या जून २०२६ पर्यंत पहिले प्रोटोटाइप ट्रेन तयार करण्याच्या योजनेवर काम करीत आहे.

वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी तीन कंपन्यांना कंत्राट देण्यात आलंय

भारतीय रेल्वेनं वंदे भारत स्लीपर ट्रेन निमिर्तीचे काम ३ कंपन्यांना दिले आहे. BEML, काइनेट रेल्वे सॉल्यूशन्स (रशियाच्या TMH आणि भारतीय RVNL यांचे संयुक्त उपक्रम). टिटागढ रेल सिस्टिम्स लिमिटेड आणि BHEL कन्सोर्टियम. या कंपन्यांकडे वंदे भारत स्लीपरचे काम सोपवण्यात आले आहे.

वंदे भारत स्लीपर गाड्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी डिझाइन केल्या जात आहेत. आतापर्यंत वंदे भारत एक्सप्रेस फक्त चेअर कार स्वरूपात चालवली जात होती. आता स्लीपर ट्रेन देखील लवकरच धावणार आहे. या स्लीपर ट्रेनद्वारे प्रवाशांना हाय स्पीड, आरामदायक आणि प्रीमियम सुविधा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT