Manasvi Choudhary
आजकाल हळदीच्या दागिन्याचे बरेच डिझाईन्स बाजारात मिळतात. स्वस्तापासून ते महाग अश्या सर्व स्वरूपाचे हळदीचे दागिने असतात.
नैसर्गिक फुलांचे किंवा कृत्रिम फुलांचे हे दागिने हळदी कार्यक्रमात नवरी मुली घालतात. हे दागिने खूप आकर्षक दिसतात आणि स्वस्त देखील असतात.
फुले, मोती, मन्यांपासून तयार केलेले हे दागिने फार आकर्षक दिसतात. यामुळे नवरी मुलीचा हळदीचा लूक उठून दिसतो.
फुलांचा मांगटिका अत्यंत सुंदर आणि आकर्षक दिसतो. सध्या अश्या प्रकारच्या दागिन्यांचा ट्रेंड सुरू आहे.
बऱ्याच ठिकाणी नववधू किवा वरांकडील मंडळीदेखील अश्या स्वरूपाचे बिदींया कपाळावर लावतात.
फुलांनी सजवलेले हातफूल नववधूच्या हातावर मोहक दिसतात यामुळे नवरीचा लूक खुपच सुंदर दिसतो.
साडीच्या रंगाला मॅचिंग असे पांढऱ्या आणि गुलाबी फुलांच्या डिझाईनमध्ये तुम्ही हे खास तयार करून घेऊ शकतात.
तुम्ही तुम्हाला हव्या त्या रंगाच्या फुलांचा हार, मंगटिका, बाजूबंद, अंगठ्या असा सेट देखील बनवून घेऊ शकता.