
शिवहर महामार्गावर अपघाताचा थरार.
ट्रॅक्टर ट्रोली आणि पिकअपचा अपघात.
दोन्ही वाहनांचे चालक फरार.
पोलिसांकडून तपास सुरू.
बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये भीषण रस्ता अपघाताची घटना घडली. शुक्रवारी सायंकाळी झालेल्या भीषण रस्ते अपघातात चार जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. मीनापूर पोलीस स्टेशन परिसरातील दरीपट्टीजवळ शिवहर राज्य महामार्गावर विटांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रोली आणि मालवाहू पिकअपची जोरदार टक्कर झाली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, एका मुलीचा रूग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. अपघातानंतर मृतदेह रस्त्यावर विखुरलेले होते. आरोपी दोन्ही चालक फरार झाले असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.
पिकअपमधील सर्व लोक मीनापूर ब्लॉकमधील होते. समस्तीपूर जिल्ह्यातील येउरा येथील मेळाव्याला जाऊन ते पुन्हा परतीच्या मार्गावर होते. मात्र, गावी पोहोचण्याआधीच महामार्गावर विटांनी भरलेल्या ट्रॅक्टर ट्रोली आणि पिकअप वाहनाचा अपघात घडला. अपघातात बिन्दा सहनी, बंधु सहनी, चंदेश्वर सहनी आणि विगन सहनी यांची मुलगी (वय वर्ष ६) या लोकांचा मृ्त्यू झाला. तर, दोन महिलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
पोलीस स्टेशनचे अधिकारी राम एकबाल प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात एकूण चार जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबाकडून तक्रार दाखल झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अपघात घडल्यानंतर पिकअपमधील लोक दुरवर फेकले गेले होते. सर्वांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. ट्रॅक्टर अन् पिकअपचा चुराडा झाला. अपघात घडल्यानंतर दोन्ही वाहनाच्या चालकांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली. सध्या या घटनेचा तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.