Vande Bharat Train  Saamtv
देश विदेश

Vande Bharat Express : दहा वंदे भारत स्लिपर ट्रेन लवकरच धावणार, मार्ग कोणता? असा आहे रेल्वे विभागाचा नवा प्लॉन

Vande Bharat Sleeper Express : वंदे भारतच्या यशानंतर आता वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच सुरू होणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई, (Vande Bharat Express) वंदे भारत एक्सप्रेस भारतीयांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. लोप्रिय ठरत असलेल्या या रेल्वेबद्दल प्रवाशांसोबतच रेल्वेही खूप उत्सुक आहे. वंदे भारतच्या यशानंतर आता वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच सुरू होणार आहेत. भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर २०२५-२६ पर्यंत वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी अंतीम टप्प्यात आली आहे. या गाड्या आरामदायी, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आधुनिक डिझाइनसह दिल्या जातील.

१० वंदे भारत एक्सप्रेस होणार सेवेत दाखल

 एका अहवालानुसार, भारतीय रेल्वे २०२५-२६ पर्यंत १० नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची योजना आखत आहे. भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन २०२५ मध्ये चाचणीनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. महाव्यवस्थापक, इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF), चेन्नई, यू. सुब्बा राव यांनी याला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की १५ नोव्हेंबरपासून या गाड्यांच्या दोलन चाचण्या आणि इतर चाचण्या दोन महिन्यांसाठी घेतल्या जातील, त्यानंतर त्या व्यावसायिक सेवेत आणल्या जातील.

वंदे भारत स्लीपर ट्रेनची रचना प्रवाशांच्या सुरक्षिततेला आणि सोयींना प्राधान्य देऊन करण्यात आली आहे. या गाड्या उच्च ताकदीच्या ऑस्टेनिटिक स्टेनलेस स्टीलपासून बनवल्या जातात. त्यांच्यात क्रॅश बफर आणि खास डिझाइन केलेले कपलर सारखी प्रगत सुरक्षा उपकरणे बसवली आहेत, जी आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यास सक्षम आहेत.

वंदे भारत स्लीपरमध्ये काय सुविधा असतील?

या गाड्यांना एकूण १६ डबे असतील आणि त्यांची क्षमता ८२३ प्रवासी असेल. या प्रवासासाठी फर्स्ट क्लास एसी, सेकंड क्लास एसी आणि थर्ड क्लास एसी सुविधा उपलब्ध असतील. रेल्वेने अद्याप वंदे भारत स्लीपर गाड्यांच्या मार्गांची औपचारिक घोषणा केलेली नसली तरी, सुरुवातीच्या सेवा नवी दिल्ली ते पुणे किंवा नवी दिल्ली ते श्रीनगर या प्रमुख शहरांदरम्यान चालवल्या जाण्याची शक्यता आहे.

Edited by- नितीश गाडगे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT