Vande Bharat Saam Tv
देश विदेश

आता वंदे भारतचा प्रवास होईल स्वस्त; फक्त १ ऑपशनवर क्लिक करा; ३०० रूपयांपर्यंत होईल बचत

How to Reduce Vande Bharat Ticket Fare: वंदे भारत ट्रेनमध्ये तिकीट बुक करताना जेवणाचा पर्याय नाकारल्यास तिकिटावर थेट बचत होते.

Bhagyashree Kamble

वंदे भारत ट्रेनची सध्या भारतभर चर्चा आहे. अनेकांना या ट्रेनमधून प्रवास करायला आवडते. मात्र, या ट्रेनच्या तिकीटांची किंमत सामान्य एक्स्प्रेसच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे अनेक जण या ट्रेनमधून प्रवास करणं टाळतात. पण तुम्हाला माहितीय का? की वंदे भारत ट्रेनच्या तिकीटातील दर कमी करण्यासाठी एक पर्यायाचा वापर करू शकता. यामुळे आपल्या तिकीटाच्या दरात कमालीची घट होऊ शकते.

खरंतर, वंदे भारत तिकीट बुक करताना तुम्हाला जेवणाचा पर्याय मिळतो. जर तुम्ही तो पर्याय निवडला नाही. तिकीटाच्या दरात घट होऊ शकते. वंदे भारतमध्ये जेवणाचा पर्याय नाकारून आपण सीसी कॅटगरीच्या तिकिटावर ३०० रूपयांपर्यंतची बचत कशी करू शकता?हे आपण जाणून घेऊयात.

तिकीट बुकिंगदरम्यान नेमकं काय लक्षात ठेवायचं?

वंदे भारत ट्रेनचं तिकीट बुक करताना IRCTCच्या वेबसाइट किंवा अॅपवर Meal / No Meal असा पर्याय दिलेला असतो. जर आपण No Meal हा पर्याय निवडला तर, जेवणाचा खर्च तुमच्या भाड्यातून वजा केला जातो. प्रवास करताना आपल्याला जेवण मिळत नाही. यामुळे आपल्या तिकीट भाड्याच्या दरात घट होते.

उदाहरणार्थ

नवी दिल्ली ते वाराणसी वंदे भारत एक्स्प्रेसचे एकूण भाडे १,७७८ आहे. ज्यात जेवणाचा खर्च समाविष्ट आहे. परंतु, जर तुम्ही जेवणाचा पर्याय नाकारलात तर, या तिकीट दरात २९० रूपयांची बचत होते. यासाठी आपल्याला १,४८८ रूपये मोजावे लागतील. जर, तुम्हाला दिल्ली वाराणसी या ८ तासांच्या प्रवासादरम्यान, ट्रेनमधील जेवण आवश्यक नसेल तर, तुम्ही ही तिकीटावर सहज बचत करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kobi Aloo Matar Bhaji: नुसती कोबीची भाजी खाऊन कंटाळता? हे पदार्थ मिक्स करून होईल चमचमीत भाजी

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत १६५ कोटींचा घोटाळा; १२ हजार पुरुष लाभार्थी; पैसे वसूल करणार

Maharashtra Live News Update: विक्रोळी पुर्व द्रुतगती मार्गावरील प्रवीण हॉटेल पादचारी पुलाखाली २ मोटारसायकलचा अपघात

Mushroom Benefits: हिवाळ्यात मशरुम खाण्याने होतील 'हे' हेल्दी फायदे

EPFO News : PF खातेधारकांसाठी गुड न्यूज! लग्नासाठी १०० टक्के पैसे काढू शकता, काय आहे प्रोसेस? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT