First Vande Bharat Express in Jammu and Kashmir Saam Tv
देश विदेश

Vande Bharat Express : जम्मू-काश्मीरमध्ये धावली पहिली वंदे भारत एक्स्प्रेस, जगातील सर्वात उंच पुलावरुन केला प्रवास; पाहा VIDEO

Vande Bharat Express in Jammu and Kashmir : आज जम्मू-काश्मीरमधील पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचा ट्रायल रन पार पडला. ही ट्रेन जगातील सर्वात उंच पूल म्हणजे चिनाब रेल्वे पुलावरुन धावली.

Yash Shirke

Vande Bharat Express News : जम्मू-काश्मीरमध्ये पहिली वंदे भारत एक्स्प्रेस धावली आहे. आज (२५ जानेवारी) श्री माता वैष्णोदेवी कटरा ते श्रीनगर या दोन रेल्वे स्थानकांदरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचा पहिला ट्रायल पार पडला. विशेष म्हणजे जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावरुन वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास केला. याशिवाय ही ट्रेन भारतातील पहिल्या केबल रेल्वे पुलावरुनही धावली.

आज जम्मू-काश्मीरमधल्या पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसचा ट्रायर रन पार पडला. या ट्रेनने जगातील सर्वात उंच रेल्वे पूल अशी ओळख असलेल्या 'चिनाब रेल्वे पूला'वरुन प्रवास केला. तसेच ही वंदे भारत ट्रेन 'अंजी खड्डा' या भारतील रेल्वेने बांधलेल्या पहिल्या केबल पुलावरुनही धावली. जम्मू-काश्मीरच्या थंड हवामानाचा अभ्यास करुन या वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनची निर्मिती करण्यात आली आहे.

या वंदे भारत एक्स्प्रेसच्या ट्रायलचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत वंदे भारत एक्स्प्रेस जगातल्या सर्वात उंच पुलावरुन धावताना दिसते. ट्रेनचा ट्रायल पूर्ण झाला असून लवकरच या वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करता येणार आहे. या ट्रेनने 'कटरा ते श्रीनगर' हा १९० किलोमीटरचा प्रवास फक्त ३ तासांमध्ये करणे शक्य होईल असे म्हटले जात आहे. या नव्या एक्स्प्रेसची पर्यटकांमध्ये चर्चा आहे. यामुळे तेथील पर्यटनाला अधिक चालना मिळेल असा विश्वास प्रशासनाला आहे.

जम्मू-काश्मीरमधील ही वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन देशातील अन्य वंदे भारत एक्स्प्रेसपेक्षा वेगळी आहे. या ट्रेनमध्ये हीटिंग सिस्टीम बसवण्यात आली आहे. यामुळे थंड वातावरणात सुलभपणे प्रवास करता येणार आहे. यातील खास वैशिष्ट्य म्हणजे ट्रेनच्या विंडशील्डवर हीटिंग सिस्टीम असणार आहे. या सिस्टीममुळे थंड हवामान असतानाही बाहेरचे दृश्य पाहता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT