
वास्को: गोव्यात उभारण्यात आलेल्या देशातील एकमेव सी - आकाराच्या केबल स्टे ब्रिजचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मंगळवारी (२१ जानेवारी) पार पडले. आधुनिक इंजिनिअरिंगचा आविष्कार असलेल्या या उड्डाणपुलामुळे दक्षिण आणि उत्तर गोव्याला जोडणारी वाहतूक वेगवान होणार आहे. शंभरहून अधिक वर्षे जुनी असलेल्या आणि पायाभूत सुविधा निर्मितीचा दांडगा अनुभव असणाऱ्या 'गॅमन इंजिनियर्स अँड काँट्रॅक्टर्स' यांनी या पुलाचे काम केले आहे.
गॅमनचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मारुती जंबगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेकलेस ऑफ वास्को हा भारतातील एक आयकॉनिक केबल स्टे ब्रिज असून, त्याची निर्मिती उच्च दर्जाच्या मानकांसह अधिक अचूकतेने करण्यात आली आहे. मंत्री गडकरींच्या हस्ते आज (२१ जानेवारी) हा पूल सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे.
कंपनीचे महाव्यवस्थापक आणि या प्रकल्पाचे व्यवस्थापक दीपक बांदेकर यांनी या पुलाबाबत माहिती देताना, पायाभूत सुविधा निर्मिती, रस्ते आणि पूल बांधकामातील एवढ्या वर्षांच्या अनुभवाच्या आधारे उच्च दर्जाच्या या पुलाची उभारणी करण्यात आल्याचे सांगितले. तसेच, वास्को शहरातील वाहतूक आणि पोर्टला मिळणारी कनेक्टिव्हिटी विचारात घेऊन पूल उभारण्यात आल्याचे बांदेकर म्हणाले.
मुरगाव रवींद्र भवन ते एमपीटीला जोडणाऱ्या आठ किलोमीटर लांबीच्या या केबल स्टे ब्रिजवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीय. पुलावरील रोषणाई रात्रीच्या वेळेस अधिक आकर्षक दिसणार असून, यामुळे पर्यटकांना देखील आकर्षित करेल.
पुलाची मजबूती आणि सुरक्षेची वारंवार योग्य तपासणी व्हावी यासाठी या पुलाची वेळोवेळी स्थिती मॉनिटर करणारी सुविधा येथे कार्यान्वित करण्यात आलीय. यामुळे पुलाच्या रिअल टाईम स्थितीबाबत वेळोवेळी माहिती मिळणे सुलभ होणार आहे. मुरगावातील सी आकाराचा हा उड्डाणपूल देशातील एकमेव केबल स्टे ब्रिज आहे. पुलावरील आधुनिक यंत्रणा आणि सुविधा विचारात घेता हा देशातील एकमेव पूल आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.