Vande Bharat Train Accident
Vande Bharat Train Accident Saam TV
देश विदेश

Vande Bharat Accident: वंदे भारत एक्स्प्रेसच्या धडकेत गाय हवेत उडाली, शौचास बसलेल्याच्या अंगावर पडली; दोघांचा मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

Vande Bharat Train Accident: वंदे भारत ट्रेनचा वेग जास्त असल्याने अनेकदा या ट्रेनची धडक बसून जनावरांसह वन्य प्राण्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर येतात. अशीच एक घटना राजस्थानमधील अलवरमधून समोर आली आहे. भरधाव वेगाने जात असलेल्या वंदे भारत ट्रेनने एका गाईला जोरदार धडक दिली.

ही धडकी इतकी भीषण होती की, गाय अक्षरश: हवेत उडून बाजूला शौचालयाला बसलेल्या व्यक्तीच्या अंगावर पडली. या घटनेत गाईसह त्या व्यक्तीचा देखील मृत्यू झाला. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना अरावली विहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.  (Latest Marathi News)

शिवदयाल शर्मा (वय ५२ वर्ष) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शर्मा हे २३ वर्षांपूर्वी भारतीय रेल्वेतून इलेक्ट्रिशियन म्हणून सेवानिवृत्त झाले होते. शिवदयाल यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास ते रेल्वे ट्रॅक परिसरात शौचालयाला गेले होते.

त्याचवेळी काली मोरी गेट येथून वंदे भारत ट्रेन भरधाव वेगाने येत होती. या ट्रेनच्या समोर एक गाय आडवी आली. काही कळण्याच्या आतच ट्रेनने गाईला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, गायीच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या.

त्यातील एक भलामोठा भाग ३० मीटर अंतरावर शौचालयाला बसलेल्या शिवदयाल यांच्या अंगावर पडला. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह रेल्वे पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी शिवदयाल यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. या घटनेनं शर्मा कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, वंदे भारत ट्रेनला गुरांचा अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही.

याआधी रेल्वेला अपघात होऊन गुरे मृत्युमुखी पडून रेल्वेचे नुकसान झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, रेल्वे रुळावरील या अपघातांच्या घटना रोखता येणे अशक्य आहे. ट्रेनचा वेग सुमारे 130-160 किमी प्रतितास असल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Cyber Fraud: धक्कादायक! शेअर ट्रेडिंमधून पैसा कमावण्याचे आमिष; पुण्यातील हॉटेल व्यावसायिकाला ४३ लाखांचा गंडा

Sanjay Raut : मुंबई महापालिकेने पंतप्रधान मोदींच्या रोड शोसाठी ३ कोटी दिले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Pune Rain News: विज पडल्याच्या आवाजाने घाबरुन ३ महिला पडल्या बेशुद्ध; एकीचा मृत्यू

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; सामान्यांना मोठा दिलासा

Thane Crime News: धक्कादायक! मुंबईत धावत्या ट्रेनमध्ये मॉडेलवर अत्याचार; घटनेनंतर ३९ दिवसांनी गाठले पोलीस ठाणे

SCROLL FOR NEXT