Young Man Proposed to Married Women  Saam TV
देश विदेश

Viral News : विवाहित महिलेला प्रपोज करायला गेला अन् फजिती करून बसला; तरुणाला घडली चांगलीच अद्दल, पाहा VIDEO

तरुणाने कुठल्याही परिणामाचा विचार न करता भररस्त्यात चक्क एका विवाहित महिलेला प्रपोज केलं.

Satish Daud

Young Man Proposed to Married Women : प्रेम हे आंधळं असतं असं म्हणतात, होय ते खरंच आहे. कारण, प्रेमासाठी कलियुगातील प्रेमीयुगुल काय करतील याचा अंदाज बांधणं कठीण आहे. सध्या व्हॅलेंटाईनचा आठवडा सुरू असून अनेक तरुण प्रेयसीच्या शोधात आहे. पण प्रपोज कुणाला करावं याचाही अंदाज हवा. कारण, प्रेम व्यक्त करणे हा गुन्हा नसला तरी असे करण्याआधी त्याच्या परिणामांचा विचार करायला हवा. (Latest Marathi News)

सध्या सोशल मीडियावर एका तरुणाच्या प्रपोजची चांगलीच चर्चा सुरू आहे. या तरुणाने कुठल्याही परिणामाचा विचार न करता भररस्त्यात चक्क एका विवाहित महिलेला (Woman) प्रपोज केलं. तरुणाचं हे कृत्य बघून महिलाही चांगलीच भडकली. त्यानंतर भररस्त्यात हायव्होल्टेज ड्रामा सुरू झाला.

या विवाहित महिलेने भररस्त्यातच प्रपोज करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाची चांगलीच खरडपट्टी केली. मी तुझ्या आईच्या वयाची आहे, असं म्हणत महिलेने तरुणाला चप्पलेने चांगलाच चोप दिला. भर रस्त्यावर सुरू असलेला हायव्होल्टेज ड्रामा पाहून अनेकांची गर्दी जमा झाली. गर्दीतील एका वयोवृद्ध व्यक्तीने देखील या तरुणावर हात साफ करून घेतला.

व्हिडीओत काय आहे?

 व्हायरल (viral Video) झालेल्या व्हिडीओत भर रस्त्यात गोंधळ होत असलेला पहायला मिळत आहे. यामध्ये महिला म्हणत आहे की, याने मला काय म्हटले सांगायलाही लाज वाटत आहे. त्याचं वय काय आणि माझं वय काय. माझं मुलगाच याच्याएवढा असेल. महिला ओरडत ओरडत मुलाला विचारते, तुला लाज वाटत नाही का? अचानक एक व्यक्ती येऊन तरुणाच्या कानाखाली मारतो. त्यानंतर वातावरण अधिकच तापतं.

व्हायरल होत असलेल्या या तरुणाचा व्हिडीओ @gharkekaleshh या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. विवाहित महिलेला फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज करायला गेलेल्या तरुणाची चांगलीत फजिती झाली आहे. तरुणाच्या या कृत्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी बघितला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramdas Kadam : "पालकमंत्री व्हायचं असेल तर मुंबई-गोवा महामार्ग नीट करा" रामदास कदम यांच भरत गोगावले यांना आवाहन | VIDEO

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

Maharashtra Police : प्रमोशन रखडले, निवृत्ती जवळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची फरफट; जाणून घ्या सविस्तर

BMC Recruitment: खुशखबर! बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; पगार ५०,००० रुपये; आजच अर्ज करा

Shravan Somwar Shivamuth: श्रावणात पहिल्या सोमवारी शंकराला कोणती शिवामूठ वाहावी?

SCROLL FOR NEXT