Valentine Day Tragedy noida news  Saam tv
देश विदेश

Valentine Day Tragedy : व्हॅलेंटाइन डेला प्रेमाचा भयानक शेवट; बंद कारमध्ये आढळले तरुण-तरुणीचे मृतदेह

Valentine Day Tragedy noida news : व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी जोडप्याचा मृतदेह कारमध्ये आढळला आहे. आधी गर्लफ्रेंडची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर बॉयफ्रेंडने आत्महत्या केली.

Vishal Gangurde

व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी घडली दुर्दैवी घटना

व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी कारमध्ये सापडला जोडप्याचा मृतदेह

पोलिसांकडून जलदगतीने तपास सुरू

व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी धक्कादायक घटना घडली आहे. एका जोडप्याने व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी आत्महत्या केली आहे. बॉयफ्रेंडने आधी गर्लफ्रेंडवर गोळी झाडली. त्यानंतर बॉयफ्रेंडने स्वत:वर गोळी झाडून आयुष्य संपवलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांना रुग्णालयात दाखल केलं. परंतु डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केलं. पोलिसांनी या प्रकरणाचा जलदगतीने तपास सुरू केला आहे.

व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये जोडप्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दोघांचे मृतदेह एका कारमध्ये आढळले आहेत. नोएडा येथील सेक्टर ३९ मधील सेक्टर १०७ रोड परिसरात ही घटना घडली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघेही त्रिलोकपुरी येथील रहिवासी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचं नाव हे सुमित आहे. तो दिल्लीच्या त्रिलोकपुरीमध्ये राहत होता. तर मृत तरुणीचं नाव रेखा आहे. ती नोएडाच्या सेक्टर ५८ सेक्टरमध्ये राहत होती. दोघे कालपासून बेपत्ता होते. दोघे जण बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत दिली होती.

मृत्यूआधी सुमितने रेखाला एक मेसेज केला होता. त्याने म्हटलं होतं की, 'मी आत्महत्या करायला जात आहे. त्यास रेखा जबाबदार आहे. १५ वर्षांपासून एकत्र राहणाऱ्या रेखाने लग्नाचं वचन दिलं होतं. परंतु ती दुसऱ्या मुलासोबत लग्न करत आहे. यामुळे मी आत्महत्या करत आहे. कारण रेखाने मला धोका दिला आहे. मी आता आत्महत्या करत आहे'.

पोलिसांनी दोघांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. त्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. फॉरेन्सिक रिपोर्टनंतर दोघांच्या मृत्यूचं कारण समोर येईल. प्राथमिक तपासानुसार तरुणाने आत्महत्या केल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT