वैभव सूर्यवंशी ठरला सर्वात युवा खेळाडू, सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडला saam tv
देश विदेश

Vaibhav Sooryavanshi : टीम इंडियात एन्ट्री होताच वैभव सूर्यवंशीनं मोडला सचिन तेंडुलकरचा ३७ वर्षे जुना रेकॉर्ड

vaibhav sooryavanshi breaks sachin tendulkar record : भारताच्या टी २० आंतरराष्ट्रीय संघात वैभव सूर्यवंशीची निवड झाली आहे. त्याची संघात एन्ट्री होताच महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा ३७ वर्षे जुना रेकॉर्ड मोडला आहे.

Nandkumar Joshi

सध्याचा भारताचा सुपरस्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी याला शनिवारी एशियन्स गेम्ससाठी निवडलेल्या भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. याशिवाय आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या संघातही संधी देण्यात आली आहे. वैभव सूर्यवंशी हा भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवणारा सर्वात कमी वयाचा फलंदाज ठरला आहे. त्यानं महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा ३७ वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. सचिन तेंडुलकरची पाकिस्तान दौऱ्यासाठी १९८९ मध्ये १६ वर्षांचा असताना संघात निवड केली होती.

वैभव सूर्यवंशी यानं आधी अंडर १९ क्रिकेट आणि नुकत्याच झालेल्या आयपीएल २०२६ मध्ये विस्फोटक फलंदाजी केली होती. गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली होती. आयपीएलसारख्या महत्वाच्या स्पर्धेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. याचं बक्षीस त्याला मिळालं आहे. भारतीय संघात सर्वात कमी वयात त्याला संधी मिळाली आहे. क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरचा त्यानं विक्रम मोडला आहे.

सचिन तेंडुलकरची अवघ्या १६ व्या वर्षी भारतीय संघात निवड झाली होती. पाकिस्तानविरुद्ध निवडलेल्या भारतीय संघात १६ वर्षी त्याला स्थान मिळालं होतं. भारतीय संघात पदार्पण केलं त्यावेळी सचिनचं वय १६ वर्षे २०५ दिवस होते. १५ नोव्हेंबर १९८९ रोजी पाकिस्तानविरुद्ध तो पहिला सामना खेळला होता.

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशी यानं भारतीय संघातील निवडीसह इतिहास रचला आहे. सचिन तेंडुलकरला मागे टाकत भारताच्या संघात स्थान मिळवणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे. आयपीएलमध्ये केलेल्या फलंदाजीनं वैभवनं आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्गज खेळाडूंना प्रभावित केलं होतं. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज ठरला. याशिवाय त्याचा स्ट्राइक रेटही सर्वाधिक होता. वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात संधी दिली पाहिजे, अशी मागणी अनेक खेळाडूंनी केली होती. आता त्याला भारतीय संघात संधी मिळाली आहे. या संधीचं तो सोनं करणार का, याकडं अवघ्या क्रीडाविश्वाचं लक्ष राहिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शैक्षणिक कर्जाची मर्यादा ५ वरून २० लाख करा; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची मागणी, सुनेत्रा पवारांची घेतली भेट

PM Modi Photo Removal Case: मनसेच्या नेत्याला मुंबईतून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Nepal Flood: महापुरात घरं वाहून नेली, पण निष्ठा नाही! मालकाच्या प्रतीक्षेत कुत्रे ढिगाऱ्याजवळ ठाण मांडून

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना आणखी धक्के बसणार? 6 नगरसेवक सोडणार ठाकरेंची साथ, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

जमिनीसाठी आई-बापाच्या जीवावर उठले, निर्लज्ज मुलांची आई-वडिलांना भररस्त्यात मारहाण

SCROLL FOR NEXT