Uttarkashi tunnel Crash News/ANI SAAM TV
देश विदेश

Uttarkashi Tunnel Rescue: उत्तरकाशी बचावकार्यात पुन्हा अडथळा! अमेरिकन ऑगर मशीनमध्ये बिघाड; हवामान खात्याच्या इशाऱ्याने धोका वाढला?

Tunnel Rescue Update: उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्याचे काम गेल्या १५ दिवसांपासून अविरत सुरू आहे. कामगारांना त्यांच्या कुटुंबीयांशी बोलता यावे यासाठी BSNL (भारत संचार निगम लिमिटेड) ने लँडलाईन फोनची व्यवस्था केली आहे.

Gangappa Pujari

Uttarakhand Tunnel Rescue Update:

उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्याचे काम गेल्या १५ दिवसांपासून अविरत सुरू आहे. मात्र बचावकार्यात पदोपदी अडथळे निर्माण होत असल्यामुळे अद्याप कामगारांपर्यंत पोहोचता आलेलं नाही. शुक्रवारी ड्रिलिंग सुरू असताना ऑगर मशिनचा काही भाग अडकल्याने मशिन पूर्णपणे बिघडले होते, त्यानंतर आता दुसऱ्या पर्यायावर काम सुरू करण्यात आले आहे.

कामगारांना वाचवण्यासाठी वरून आडवे ड्रिलिंग केले जाणार आहे, जे धोकादायक आहे. तसेच यास बराच वेळ लागू शकतो. दरम्यान, हवामान खात्यानेही यलो अलर्ट जारी केला असून त्यामुळे बचावकार्यातील अडचणी आणखी वाढू शकतात.

उत्तरकाशी बोगद्यातील कामगारांना वाचवण्यासाठी डोंगराच्या माथ्यापासून आडवे खोदकाम केले जाईल, ज्यामध्ये सुमारे 90 मीटरपर्यंत खोदकाम करावे लागेल. उत्खननादरम्यान मलबा पडू शकतो आणि खाली कामगार आहेत, त्यामुळे ते जास्त धोकादायक आहे. तज्ञांच्या मते, यास 6-7 दिवस लागू शकतात, मात्र ड्रिलिंग करताना कोणतीही समस्या उद्भवली तर ही वेळ आणखी वाढू शकते.

कामगारांना त्यांच्या कुटुंबीयांशी बोलता यावे यासाठी BSNL (भारत संचार निगम लिमिटेड) ने लँडलाईन फोनची व्यवस्था केली आहे. तसेच, बोगद्याच्या आत बचावकार्यात गुंतलेल्या लोकांसाठी सुरक्षा छत्री तयार केली जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हवामान खात्याच्या इशाऱ्याने वाढला धोका..

दरम्यान, बचावकार्यात येणाऱ्या अडचणींदरम्यान आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. उत्तराखंडमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीबाबत हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने उत्तराखंडमधील चमोली, पिथौरागढ, अल्मोडासह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

असे झाल्यास बचाव कार्यात आणखी अडचणी येऊ शकतात. वास्तविक, पाऊस पडल्यानंतर माती खचू लागते, त्यामुळे बचाव करणे कठीण होते. याशिवाय वाढत्या थंडीमुळे बचावकार्यात गुंतलेल्या लोकांच्या अडचणीही वाढू शकतात. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT