Uttarakhand Tunnel Accident Update Saam Digital
देश विदेश

Uttarakhand Tunnel Accident Update: उत्तरकाशी बचावकार्याचा १६ वा दिवस; बोगद्यात अडकलेले ४१ कामगार फक्त ५ मीटर अंतरावर, आजच मिळू शकते शुभवार्ता

Uttarakhand Tunnel Accident Update: उत्तराखंडमधील बोगद्यात 16 दिवसांपासून अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अमेरिकेच्या ऑगर मशिनमध्ये बिघाड झाल्यानंतर आता ड्रिलिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान सिलक्यारा बोगद्यातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Uttarakhand Tunnel Accident Update

उत्तराखंडमधील बोगद्यात 16 दिवसांपासून अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अमेरिकेच्या ऑगर मशिनमध्ये बिघाड झाल्यानंतर आता ड्रिलिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान सिलक्यारा बोगद्यातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांपर्यंतच अंतर फक्त ५ मीटर शिल्लक असून आजच कामगारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ड्रिलिंग किंवा बचाव कार्यात इतर कोणताही अडथळा आला नाही तर लवकरच कामगारांपर्यंत पोहोचता येईल, असे बचाव पथकाकडून सांगण्यात आले आहे.

खान कामगार बोगद्यात कोसळलेली दरड हटविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मॅन्युअल ड्रिलिंगसाठी तीन टीम तयार करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे बोगद्याच्यावरून देखील खोदकाम सुरू आहे.सोमवारी बोगद्यातील मॅन्युअल काम सुरू झाले. अमेरिकन ऑगर मशीनने ड्रिलिंगचे काम करण्यात येत होते. मात्र शुक्रवारी ही मशीन ढिगाऱ्यात अडकली. दरम्यामन ४० टक्के खोदकाम पूर्ण झाले आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील दनतेला बोगद्यात अडकलेल्या कामगारांसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. तेलंगणाच्या दौऱ्यावर असलेले मोदी म्हणाले, आज आपण देवी देवतांची पूजा करतो, प्रार्थना करतो. मानवतेच्या कल्याणाविषयी बोलतो. उत्तराखंडमधील बोगद्यात गेल्या दोन आठवड्यापासून कामगार अडकले आहेत. १६ दिवसांपासून मृत्यूशी झुंज देतायेत. त्या कामगारांसाठी देखील आपण प्रार्थना केली पाहिजे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय आहे रॅट मायनिंग?

खाणीत किंवा बोगद्यात अरुंद ठिकाणी हाताने खोदकाम केले जाते, त्याला रॅल मायनिंग म्हटलं जातं.दगडी कोळसा किंवा इतर खाणींमध्ये अशा पद्धतीचे काम चालते. हाताने खोदकाम करण्यासाठी सुरुवातीला दोन कामगार पाईपमधून जातात. एक खोदकाम करतो आणि दुसरा माती किंवा दगड ट्रॉलीतून बाहेर काढतो. एक टीम थकली की दुसरी टीम खोदकाम करण्याठी पाईपमध्ये जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dance Viral Video: महिलांची कमाल! नऊवारी साडी नेसून महिलांनी धरला 'ही पोगरी असली' गाण्यावर ठेका;Video व्हायरल

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

Parenting Tips: पॅरेंटल बर्नआउटचे बळी ठरू शकतात पालक; हे आहे मुख्य कारण

Tiger Life: वाघ किती वर्षे जगतो?

Madhuri Dixit: "श्रीदेवी आणि माझं नातं..." माधुरी दीक्षित दिवगंत अभिनेत्रीविषयी स्पष्टच बोलली

SCROLL FOR NEXT