जैन तत्वज्ञ श्रीमद राजचंद्राजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित एका कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना महात्मा गांधींशी केलीय. धनखड यांच्या विधानावर काँग्रेसने आक्षेप घेत त्याच्यावर टीकेची झोड उठवलीय. धनखड यांच्या विधान लाजीरवाणं असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसने दिलीय. (Latest News)
उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे जैन तत्वज्ञ श्रीमद राजचंद्राजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. "मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, महात्मा गांधी हे गेल्या शतकातील 'महापुरुष' होते. तर नरेंद्र मोदी हे या शतकातील 'युगपुरुष' आहेत. गांधींनी सत्य आणि अहिंसेच्या जोरावर आपल्याला ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त केलं. तर पंतप्रधान मोदींनी देशाला विकासाच्या मार्गावर नेलं आहे जे आपल्याला कायमचं हवं होतं. महात्मा गांधी आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये श्रीमद राजचंद्रजी यांची शिकवण दिसून येते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
उपराष्ट्रपतींनी केलेल्या या विधानावर काँग्रेसनं आक्षेप घेतलाय. हे लाजीरवानं असल्याचं म्हटलंय. काँग्रेस नेते माणिकम टागोर यांनी आपल्या ट्वीटर पोस्टमधून टीका केलीय. जर तुम्ही पंतप्रधान मोदींची तुलना गांधीजींशी करत असाल तर हे लाजीरवाणं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की तुलना करायला पण एक मर्यादा असते, तुम्ही ती ओलांडली असल्याची टीका केलीय.
समाजवादी पार्टीचे खासदार दानिश अली यांना भाजप खासदार रमेश भिदुरी यांनी शिवीगाळ केल्याप्रकरणी टोला मारला. मला आश्चर्य वाटतं, आपल्याकडे नवं युग सुरू झालंय ज्यामध्ये संसदेत पंतप्रधानांच्या पक्षाच्या खासदारांना एका विशिष्ट समाजाविरोधात शिवीगाळ करण्याला परवानगी दिली जाते, असं दानिश अली म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.