Uttarakhand Politics Saam tv
देश विदेश

20-25 हजारांमध्ये मुली मिळतात; भाजप मंत्र्यांच्या पतीने अकलेचे तारे तोडले, VIDEO

bjp leader controversial statement : भाजप मंत्र्यांच्या पतीने अकलेचे तारे तोडले आहेत. बिहारमध्ये 20-25 हजारांमध्ये मुली मिळतात, असं वक्तव्य भाजप मंत्र्यांच्या पतीने केलंय.

Vishal Gangurde

उत्तराखंडमध्ये राजकारण तापलं

मंत्री रेखा आर्य यांचे पती गिरधारी यांचं वादग्रस्त वक्तव्य ट

गिरधारी यांच्या वक्तव्याचा विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून समाचार

उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. उत्तराखंड सरकारमधील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. मंत्री रेखा आर्य यांचे पती गिरधारी लाल साहू यांचं बिहारी महिलांबाबतचं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'तुमचं लग्न होत नसेल तर बिहारमधून २०-२५ हजारांत मुली खरेदी करा, असं वक्तव्य गिरधारी यांनी केल्याने बिहारमधील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाने या वक्तव्यावरून भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राजदने या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्र्यांकडे स्पष्टीकरण मागितलं आहे.

राजदने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर म्हटलं की, 'मुली बिहारमधून येतील. बिहारमध्ये मुलही अवघ्या २०-२५ हजारांमध्ये मिळतात. भाजप आणि आरएसएसच्या लोकांचे बिहारच्या महिलांबाबत घृणास्पद विचार आहेत. या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्र्यांनी भाजपच्या वतीने स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. बिहारमधील भाजप, जेडीयू आणि भाजप नेत्यांनी तोंडाला कुलूप लावलं आहे.

उत्तराखंड सरकारमधील मंत्री रेखा आर्या यांचे पती गिरधारी लाल हे भाजपची बिहारच्या महिलांप्रती असणारे विचार प्रकट करत आहेत'. अंकिता भंडारी हत्याकांड प्रकरणावरून भाजप सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आहे. आता महिला सक्षमीकरण मंत्र्यांच्या पती यांच्या वक्तव्यावरून उत्तराखंड सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.

काँग्रेसनेही गिरधारी लाल साहू यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. काँग्रेसने म्हटलं आहे की,'बिहारच्या मुली २०-२५ हजारांत मिळतात, असं लाजीरवाणं वक्तव्य भाजप सरकारमधील मंत्री रेखा आर्य यांच्या पतीने केलं आहे. गिरधारी लाल साहू बिहारच्या मुलींवर बोली लावत आहेत. भाजप नेत्यांच्या मनात महिलाच्या प्रती कोणताही सन्मान नाही. त्यांचा खरा चेहरा समोर येत आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

अमरावतीत भीषण अपघात! हायड्रा क्रेनने ५ जणांना उडवले; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Veg Kolhapuri Recipe: सुट्टीच्या दिवशी घरच्या घरी बनवा धाबा स्टाईल झणझणीत व्हेज कोल्हापुरी, वाचा खास रेसिपी

Bedsheet Washing Tips: उन्हाळ्याच्या दिवसात बेडवरील चादर किती दिवसात धुतली पाहिजे?

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा नाचणीचा डोसा, चवही भन्नाट अन् आरोग्यही राहील उत्तम

SCROLL FOR NEXT