Uttarakhand Nainital Bus Accident  Saam Tv
देश विदेश

Nainital Accident: उत्तराखंडमध्ये मोठा अपघात, 32 प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली

Uttarakhand Bus Accident : उत्तराखंडमध्ये मोठा अपघात, 32 प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली

Satish Kengar

Uttarakhand Nainital Bus Accident :

उत्तराखंडमधील नैनितालमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. सुमारे ३२ प्रवासी घेऊन निघालेली बस काळाढुनगी रोडवरील नालनी येथे दरीत कोसळली. बसमध्ये प्रवास करणारे लोक हिसार (हरियाणा) येथून नैनिताल येथे जात होते. यामध्ये १८ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रविवारी आपत्ती नियंत्रण कक्ष नैनितालला कालाधुंगी रोडवरील नालनी येथे बसला अपघात झाल्याची माहिती मिळाली. यात ३० ते ३३ जण प्रवासी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. माहिती मिळताच रुद्रपूर आणि खैरना येथून एसडीआरएफचे पथक बचावकार्यासाठी रवाना झाले.

अपघातस्थळी पोहोचल्यानंतर बसमध्ये ३२ जण प्रवास करत असल्याची माहिती पथकांना मिळाली. हे प्रवासी हिसारहून नैनितालला पर्यटनासाठी येत होते. एसडीआरएफच्या बचाव पथकांनी पोलिसांसह संयुक्त बचाव मोहीम सुरू केली आणि बसमधून १८ जखमींना बाहेर काढले आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले. इतर लोकांचा शोध सुरू आहे.  (Latest Marathi News)

दरम्यान, याआधी ऑगस्ट महिन्यात उत्तराखंडमधील गंगोत्री धाम येथून परतणाऱ्या गुजरातमधील प्रवाशांना घेऊन जाणारी बस गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर गंगनानीजवळ दरीत कोसळली होती. या बसमध्ये ३५ प्रवासी होते. बस अपघातात ७ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Somwar Shivamuth: श्रावणात पहिल्या सोमवारी शंकराला कोणती शिवामूठ वाहावी?

Vijay Deverakonda : विजय देवरकोंडाची कडक ॲक्शन; 'किंगडम'चा जबरी ट्रेलर, पाहा VIDEO

Needle-free injection Nagpur: सुई, सूज, वेदना यापैकी काहीच नाही! नागपुरात मिळतंय सुईशिवाय इंजेक्शन

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

Hindi Sakti : हिंदी सक्तीविरोधात शालेय अभ्यासक्रमात मोठे बदल | VIDEO

SCROLL FOR NEXT