Uttarakhand Road Accident :  saam tv
देश विदेश

Uttarakhand Road Accident : उत्तराखंडच्या नैनीतालमध्ये भीषण दुर्घटना, जीप दरीत कोसळली; 8 जणांचा जागीच मृत्यू

Uttarakhand Road Accident news : उत्तराखंडच्या नैनीतालमधून मोठी दुर्घटना समोर आली आहे. उत्तराखंडमध्ये एक जीप दरीत कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. सोमवारी रात्री नैनीतालच्या बेतालघाटात ही घटना घडली.

Vishal Gangurde

Uttarakhand Road Accident update :

उत्तराखंडच्या नैनीतालमधून मोठी दुर्घटना समोर आली आहे. उत्तराखंडमध्ये एक जीप दरीत कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. सोमवारी रात्री नैनीतालच्या बेतालघाटात ही घटना घडली. या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जीपमध्ये ११ जण प्रवास करत होते. नैनीतालच्या बेतालघाटात झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. तर तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचं पथक घटनास्थळी पोहोचलं.

अपघातामधील मृतांचे नावे आले समोर

१. विशराम चौधरी (५०)

२. धीरज (४५)

३. अंतराम चौधरी (४०)

४. विनोद चौधरी

५. उदय राम चौधरी (५५)

६. तिलक चौधरी (४५)

७. गोपाल बसनियत (६०)

८. राजेंद्र कुमार

जखमींचे नाव

१. शांती चौधरी

२. छोटू चौधरी

३. प्रेम बहादूर

तत्पूर्वी, उत्तराखंडमध्ये काही दिवसांपूर्वी अपघाताची अशीच एक घटना घडली होती. या रस्ते अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला होता. उत्तराखंडमधील गजा तालुक्यातील दुवाकोटीजवळ अपघाताची घटना घडली होती.

या वाहनात चालकासहित ११ लोक होते. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. तर एकाचा रुग्णलयात मृत्यू झाला होता. तर आठ जण गंभीर जखमी झाले होते. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही भीषण अपघाताची घटना घडली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smart TV: स्मार्ट टीव्ही खरेदीत मोठी बचत, ८६ हजार रुपयांची सूट घेण्याची संधी

Maharashtra Live News Update: जिल्हाप्रमुख पद विकणे आहे ,चंद्रपुरमधील होर्डिंग्जमुळे उडाली खळबळ

Water For Kids: खेळण्याच्या आधी लहान मुलांनी किती पाणी प्यावं? जाणून घ्या डॉक्टरांचं मत

Cooking Tips: रोजचं वरण ठरेल आरोग्यदायी टॉनिक, फक्त 'हे' घालायला विसरू नका

GST चा १२ टक्के स्लॅब रद्द होणार? AC, ट्रॅक्टरसह विमा स्वस्त होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT