Wardha Bus Accident News:
Wardha Bus Accident News: Saamtv

Wardha Accident: वर्ध्यात एसटी बस उलटून भीषण अपघात! ४० प्रवासी जखमी; ५ जणांची प्रकृती गंभीर

Bus Accident: वर्ध्याच्या आष्टीच्या तेलाई घाटात एसटी बस उलटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात 40 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली असून जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.

चेतन व्यास, वर्धा|ता. ८ एप्रिल २०२४

Wardha Bus Accident News:

वर्ध्यामधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. वर्ध्याच्या आष्टीच्या तेलाई घाटात एसटी बस उलटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात 40 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली असून जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वर्ध्याच्या (Wardha) आष्टीच्या तेलाई घाटात एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात ४० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी पाच जणांची प्रकृती गंभी असल्याचे सांगण्यात येत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्याच्या वरुड येथून ही बस (क्र. MH 40 Y 5103) तळेगावला येत होती. यावेळी तेलाई घाटात भरधाव बस उलटून हा भीषण अपघात झाला. यामध्ये बसमधील ४० प्रवासी जखमी झाले. बसच्या महिला चालकाकडून दुचाकीला वाचवण्याच्या नादात हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Wardha Bus Accident News:
Maharashatra Election: प्रणिती शिंदे यांच्या अडचणीत वाढ; आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. पाच रुग्णावाहिकांमधून जखमींना नजिकच्या रुग्णालयात पाठवण्यात आले असून यापैकी ५ जणांची प्रकृती गंभीर आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Wardha Bus Accident News:
Gas Cylinder Blast : सिलेंडरच्या स्फोटांने मिरारोड हादरले; एकामागून एक पाच गॅस सिलेंडर ब्लास्ट, कामगारांच्या झोपड्या जाळून खाक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com