Maharashatra Election: प्रणिती शिंदे यांच्या अडचणीत वाढ; आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल

Solapur Lok Sabha Election: वैभव बिराजदार या व्यक्तीने आचारसंहिता कक्ष प्रमुखांकडे आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात तक्रार दाखल केलीय. प्रणिती शिंदे यांनी रिक्षातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या
Maharashatra Election: प्रणिती शिंदे यांच्या अडचणीत वाढ; आचारसंहिता भंग केल्याची  तक्रार दाखल
Praniti ShindeSolapur Lok Sabha Election
Published On

(विष्णूभूषण लिमये, सोलापूर)

Maharashtra Lok Sabha Election Praniti Shinde in Trouble:

महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे अडचणीत सापडल्या आहेत. प्रणिती शिंदे यांच्याविरोधात आदर्श आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल झालीय. वैभव बिराजदार या व्यक्तीने आचारसंहिता कक्ष प्रमुखांकडे तक्रार केलीय. रिक्षावर प्रणिती शिंदे यांचे बॅनर लावून प्रत्यक्ष - अप्रत्यक्षरीत्या प्रचार केला असा आरोप करण्यात आलाय. प्रणिती शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आलीय.(Latest News)

वैभव बिराजदार या व्यक्तीने आचारसंहिता कक्ष प्रमुखांकडे त्यांच्याविरोधात तक्रार केलीय. प्रणिती शिंदे ज्या रिक्षावरून फिरत होत्या त्या रिक्षावर त्यांचे बॅनर लावण्यात आले होते. त्यामुळे प्रत्यक्ष - अप्रत्यक्षरीत्या त्या पक्षाचा प्रचार होत्या असा, आरोप बिराजदार यांनी केलाय. आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केलीय.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तात्काळ योग्य ती कार्यवाही करून त्याचा अहवाल कार्यालयात सादर कराव्यात असे आदेश अप्पर जिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी दिलेत. तर दुसरीकडे प्रणिती शिंदे यांची सोलापुरात ताकद वाढलीय. प्रणिती शिंदे यांचे कट्टर विरोधक असलेले माजी आमदार नरसय्या अडम यांच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिलाय.

आता सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजप आमदार राम सातपुते यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. मात्र वंचित आघाडी तसेच एमआयएमनेही सोलापूरमधून उमेदवार जाहीर केल्याने प्रणिती शिंदेंच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत होती.

अशातच सोलापुरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिलाय. भाजपविरोधात असलेल्या सर्व विरोधी पक्षांना ताकद देण्यासाठी आम्ही काँग्रेसला पाठिंबा देतोय, असं आडाम मास्तर म्हणालेत.

Maharashatra Election: प्रणिती शिंदे यांच्या अडचणीत वाढ; आचारसंहिता भंग केल्याची  तक्रार दाखल
Praniti Shinde News: सोलापुरात प्रणिती शिंदेंची ताकद वाढली! मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा काँग्रेसला पाठिंबा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com