

साम टीव्ही आणि अॅक्सिस माय इंडियाचे एक्झिट पोल जाहीर
मुंबईत महायुतीला मोठी आघाडी मिळण्याचा अंदाज
ठाकरे बंधूंच्या राजकीय प्रभावाला धक्का
बृहन्मुंबई महानगरपालिकासह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी गुरुवारी संध्याकाळी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान संपल्यानंतर लगेचच साम टीव्ही आणि अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोल जाहीर करण्यात आले. या अंदाजामुळे ठाकरे बंधूंची चिंता वाढलीय. एक्झिट पोलनुसार मुंबईत २५ वर्षांची ठाकरेंची सत्ता उलथवण्यात भाजपाला यश येईल असा अंदाज वर्तवला जातोय.
अनेक ए्क्झिट पोलमध्ये भाजप आणि शिंदेसेनेला १०० हून अधिक जागा मिळतील असा अंदाज आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत 'महायुती' (भाजप-शिंदे सेना) चा विजय होताना दिसतोय. यामुळे ठाकरे बंधूंच्या ठाकरे ब्रँण्डची जादू कमी झाल्याचं दिसत आहे. एक्झिट अंदाज जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भविष्यवाणीची चर्चा सुरू झालीय. फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्याविषयी एक भाकित केलं होतं, फडणवीस यांची भविष्यवाणी खरी ठरली अशी चर्चा सुरू झालीय.
एक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार भाजपा महायुतीला १३८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर ठाकरे बंधूंना ५८ ते ६५ जागा मिळतील अशी शक्यता आहे. त्याशिवाय काँग्रेस आणि वंचित आघाडीला १२ ते १६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. जेडीएसच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला १२७ ते १५४ जागा मिळतील असा अंदाज वर्तवलाय. तर ठाकरे बंधूंच्या युतीला ४४ ते ६४ जागा मिळण्याचा अंदाज त्यांनी वर्तवलाय. त्याशिवाय काँग्रेस वंचित आघाडीला १६ ते २५ जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
PRAB संस्थेच्या पोलनुसार मनसेला पुण्यात एकही जागा मिळणार नाही असा अंदाज आहे. तर पुण्यात भाजपला ९३, शिंदेसेनेला ६, उद्धवसेनेला ७ आणि दोन्ही राष्ट्रवादीला मिळून ५१ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाला ६४, शिंदेसेना ९, दोन्ही राष्ट्रवादीला ५२, काँग्रेसला १ आणि मनसेला १ जागा मिळेल अशी शक्यता वर्तवली आहे. JDS या संस्थेच्या अंदाजानुसार, मुंबईत मनसेला ० ते ६ जागा मिळतील.
ठाकरे सेनेला ४४-५८, भाजपा ८७ ते १०१, शिंदेसेना ४०-५४ जागा आणि काँग्रेसला १६ ते २५ जागा मिळतील असा अंदाज आहे. JVC संस्थेनुसार भाजप ९७ ते १०८, शिंदेसेना ३२ ते ३८, काँग्रेसला २१ ते २५ जागा, ठाकरे सेनेला ५२ ते ५९, तर मनसेला फक्त २ ते ५ जागा मिळतील
दरम्यान मनसेने आजपर्यंत सर्व निवडणुका स्वबळावर लढवल्या होत्या. या निवडणुकीत प्रमुख पक्षांविरुद्ध लढताना मनसेला मुंबईत २०१२ साली २८, २०१७ साली ७ जागा मिळाल्या होत्या. तसेच पुण्यात २०१२ साली २९ आणि २०१७ साली अवघ्या २ जागा मिळाल्या होत्या. आता उद्धव ठाकरेंसोबत युती केल्यानंतर मनसेच्या पारड्यात फारसं यश मिळाले नाही अशी चिन्हे आहेत.
निवडणुकीच्या प्रचारावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरेंबाबत भविष्यवाणी केली होती. उद्धव ठाकरेंसोबत युतीत राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव होईल. ही माझी भविष्यवाणी आहे, असं भाकीत फडणवीसांनी वर्तवले होते. त्यामुळे एक्झिट पोलनुसार फडणवीसांची भविष्यवाणी खरी ठरतेय अशीच चर्चा सुरू झालीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.