Char Dham Yatra 2024 Guideline VIP Darshan and Reel Making Banned By Uttarakhand Government in Char Dham Yatra Saam TV
देश विदेश

Char Dham Yatra 2024 Guidelines: चारधाम यात्रेदरम्यान रील बनवण्यावर बंदी, व्हीआयपी दर्शनही बंद; सरकारकडून नवा आदेश जारी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चारधामच्या यात्रेला १० मे २०२४ पासून सुरु झाली आहे.त्यात केदारनाथ आणि गंगोत्री , यमुनोत्रीसह चारधामचे दर्शन करण्यासाठी देशभरातून भाविक मोठ्या प्रमाणात या यात्रेला येत आहेत. दरम्यान उत्तराखंड सरकारने इथे येणाऱ्या भाविकांसाठी एक नवीन आदेश जारी केला आहे, ज्या आदेशात चारधाम यात्रेला आलेल्या प्रत्येक यात्रेकरुंना मंदिराच्या ५० मीटरच्या परिसरात व्हिडिओ आणि रील बनविण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

सध्याच्या काळात विविध ठिकाणी गेल्यानंतर सोशल मीडियावर रील बनवणे ही एक सवय प्रत्येक व्यक्तीला लागलेली आहे. त्यातला एक विषय म्हणजे, अनेक व्यक्ती फक्त रिल बनवण्यासाठी चारधामची(char-dham) यात्रा करतात असे दिसून आले आहे,त्यामुळे मंदिराच्या परिसरात अनावश्यक गर्दी होताना दिसून येते.

यात विषयाच्या दुसऱ्या बाजूला भक्तीभावाने दर्शनाला आलेल्या भाविकांना या नाहक गोष्टींचा सामना करावा लागतो. आपल्यापैंकी प्रत्येकजण जेव्हा केदारनाथ किंवा त्या परिसरातील फोटो पाहतो, तेव्हा देवापुढे हात जोडलेल्या लोकांपेक्षा मोबाईल हातात असलेले लोक दिसून येतात. याच पाश्वर्वभूमीवर राज्य सरकारने कडक भूमिका घेतली आहे.

नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार, चारधाम यात्रे दरम्यान मंदिरांच्या साधारण ५० मीटरच्या परिसरात मोबाईल वापरण्यासाठी एसओपी जारी केली असून ५० मीटर मंदिर परिसरात संपूर्ण रील आणि व्हिडिओ बनविण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र या सर्वांवर पोलीस प्रशासन एकदम बारकाईने लक्ष ठेवणार आहे.

उत्तराखंड(Uttarakhand) राज्याचे मुख्य सचिव असलेले राधा रतुरी यांनी हा आदेश जाही केलाय. शिवाय चारधाम यात्रेसंबंधिक कोणतीही चुकीची माहिती किंवा अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींवर प्रशासन गुन्हा दाखल करणार असल्याचे ही, राधा रतुरी म्हणाले. या सर्वांवर उत्तराखंडच्या मुख्य सचिवांनी त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत

उत्तराखंडच्या मुख्य सचिव राधा रतुरी यांनी सांगितले की, शुक्रवार ३१ मे पर्यंत चारधाममध्ये व्हीआयपी (VIP)दर्शन बंद असून हरिव्दार आणि ऋषिकेशमध्ये ऑफलाईन नोंदणी रविवार १९ मे पर्यंत बंद राहील. शिवाय सचिव राधा म्हणाले की, मंदिर परिसराच्या ५० मीटरपर्यंत व्हिडिओग्राफी आणि रील मोठ्या प्रमाणात तयार केले जातात आणि एकाच ठिकाणी असंख्य लोक जमतात,त्यामुळे अनेक भाविकांची गैरसोय होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

SCROLL FOR NEXT