Uttarakhand News, File Photos Social Media
देश विदेश

Uttarakhand News: उत्तराखंडमध्ये वीटभट्टीची भिंत कोसळून ६ मजुरांचा मृत्यू, घटनेने परिसरात पसरली शोककळा

Uttarakhand collapse brick wall: उत्तराखंडच्या रुडकी येथे भीषण दुर्घटना घडली आहे. एका वीटभट्टीची भिंत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ६ मजुरांचा मृत्यू झाला आहे. या व्यतिरिक्त ७ मजूर जखमी झाले आहेत.

Vishal Gangurde

Uttarakhand latest News:

उत्तराखंडच्या रुडकी येथे भीषण दुर्घटना घडली आहे. एका वीटभट्टीची भिंत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ६ मजुरांचा मृत्यू झाला आहे. या व्यतिरिक्त ७ मजूर जखमी झाले आहेत. या जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

वीटभट्टीची भिंत कोसळून घडली भीषण घटना

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडच्या रुडकी येथील मंगलौर कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. लहबोली येथील गावात घडलेल्या घटनेत वीटभट्टीची भिंत कोसळून ६ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासमाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरु केले.

पोलिसांनी मजुरांना भिंतीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं. मात्र, तोपर्यंत या ५ मजुरांचा मृत्यू झाला होता. तर सहाव्या मजुराचा रुग्णालयात नेल्यानंतर मृत्यू झाला. तर या घटनेतील जखमींना विविध रुग्णालयात दाखल केले आहे.

घटना नेमकी कशी घडली?

लहबोली गावात सवानी नावाची वीटभट्टीत ही दुर्दैवी घटना घडली. या वीटभट्टीत १०० हून अधिक मजूर काम करतात. या वीटभट्टीत वीटा बनवण्याचं काम सुरु होतं. वीट तयार करताना एक भिंत कोसळली. या घटनेत वीटाच्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली काही मजूर अडकले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजरुांना जेसीबीच्या मदतीने बाहेर काढलं. मात्र, या घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी मजुरांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT