Uttar Pradesh Crime  Saam T
देश विदेश

Shocking News: ४ सुनांची सासू ३० वर्षांच्या बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच पाठवलं पत्र

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये ४ सुनांची सासू ३० वर्षीय बॉयफ्रेंडसोबत पळून गेली. जाता जाता ही महिला सुनांचे दागिने देखील घेऊन गेली. या महिलेचा आणि तिच्या बॉयफ्रेंडचा पोलिस शोध घेत आहेत.

Priya More

उत्तर प्रदेशमध्ये ४ सुनांची सासू आपल्या ३० वर्षीय बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याची घटना घडली. उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड भागातील ललितपूर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. महिला गावातीलच ३० वर्षीय तरुणाच्या प्रेमात पडली. या महिलेला चार मुलं असून ते सर्व विवाहित आहेत. ही महिला तरुणाच्या प्रेमात इतकी वेडी झाली की ती त्याच्यासोबत पळून गेली. पळून जाण्यापूर्वी या महिलेने आपल्या चारही सुनांचे दागिने सोबत घेऊन गेली. या घटनेची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या महिलेच्या नवऱ्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ललितपूर जिल्ह्यातील जाखोरा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात घडली. या गावात महिला नवरा, चार मुलं आणि चार सुनांसोबत राहत होती. या महिलेचे गावातील एका ३० वर्षीय तरुणाशी प्रेमसंबंध होते. २० दिवसांपूर्वी ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. महिलेने सुनांचे मौल्यवान दागिनेही चोरून सोबत नेल्याचा आरोप आहे. याप्रकरणी महिलेच्या नवऱ्याने पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर महिलेच्या नवऱ्याने थेट मुख्यमंत्री योगी यांना पत्र लिहून आपली वेदना व्यक्त केली. महिलेच्या नवऱ्याने पोलिस अधीक्षकांकडेही संपर्क साधला आणि न्यायासाठी त्यांच्याकडे मागणी केली आहे.

या महिलेच्या बॉयफ्रेंडच्या पत्नीचे असे म्हणणे आहे की, तिच्या नवऱ्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. त्याच्यामुळे गावामध्ये तोंड दाखवायला जागा उरली नाही. या महिलेने पोलिसांकडे नवऱ्याला शोधण्याची मागणीही केली आहे. हे प्रकरण गावकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनले आहे. प्रत्येक जण विविध गोष्टींवर चर्चा करत आहेत. पोलिसांच्या कारवाईवरही ते प्रश्न उपस्थित करत आहेत.

पोलिसांनी सांगितले की ते महिलेला आणि तिच्या बॉयफ्रेंडला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या दोघांबद्दलही कोणतीही माहिती नाही. पण त्यांचा शोध घेतला जात आहे. महिलेचा नवरा हरिराम पाल यांचा आरोप आहे की, त्यांच्या बायकोला त्याच गावातील कृष्णपाल झा या ३० वर्षीय तरुणाने फसवले. हरिराम पाल म्हणाले की, त्यांची पत्नी २० दिवसांपूर्वी अचानक घरातून गायब झाली. सुरुवातीला त्यांना वाटले की ती कदाचित एखाद्या नातेवाईकाच्या घरी गेली असेल. परंतू तिचा काहीच पत्ता लागला नाही आणि घरात ठेवलेले चार सुनेचे दागिनेही गायब झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जरांगे पाटलांनी आधी ऐकवली कॉल रेकॉर्डिंग, आता धनंजय मुंडेंचा कांचनसोबतचा फोटो व्हायरल

Saturday Horoscope : जुने संकल्प पूर्ण करा, काम लांबवण्याचा प्रयत्न केल्यास भविष्यात अडचणी येतील, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Diabetic Tips: तुम्हीपण मधुमेहाचे रुग्ण आहात? मग 'या' पदार्थाचं सेवन करणं ठरेल फायदेशीर

Maharashtra Live News Update:वंदे मातरम् गीताला १५० वर्षे पूर्ण; ठाण्यातील कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांचे प्रेरणादायी भाषण

Mumbai To Ekvira: मुंबई ते एकवीरा प्रवास कसा कराल? जाणून घ्या सर्वात सोयीस्कर मार्ग आणि टिप्स

SCROLL FOR NEXT