Uttar Pradesh Unnao Four Children of the Same Family Died Due to Lightning Saam Tv
देश विदेश

Uttar Pradesh News: अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद! विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील चार बालकांचा मृत्यू

Unnao News: अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद! विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील चार बालकांचा मृत्यू

Satish Kengar

Uttar Pradesh Unnao Four Children of the Same Family Died Due to Lightning:

उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये रविवारी मोठी दुर्घटना घडली आहे. येथील लालमनखेडा गावात रविवारी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास घरातील खोलीत ठेवलेल्या पंख्याच्या विजेचा धक्का लागून चार बालकांचा मुलांचा मृत्यू झाला आहे. एकापाठोपाठ एक मुले-मुलींना वाचवताना त्यांना विजेचा धक्का बसला, असं सांगण्यात येत आहे. अपघातानंतर कुटुंबात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लालमनखेडा गावातील रहिवासी वीरेंद्र कुमार यांच्या घरात पंखा लावला होता. त्यातून विद्युत प्रवाह येत होता. सगळी मुलं घरीच होती. आई आणि वडील शेतात काम करण्यासाठी गेले होते, घरी फक्त मुलं होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, पंख्याच्या शेजारील खेळत असलेल्या एका मुलाचा त्याला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसला आणि तो ओरडू लागला. आरडाओरडा ऐकून शेजारी उपस्थित असलेली अन्य तीन मुले तेथे पोहोचली आणि त्यांनाही एकामागून एक विजेचा धक्का बसला. विजेचा धक्का लागून चौघांचा जागीच मृत्यू झाला. शेजाऱ्यांना माहिती मिळताच शेतातून घाईघाईने आलेल्या पालकांनी चारही मुलांना पाहिले आणि त्यांची शुद्धच हरपली. (Latest Marathi News)

मयंक (9), हिमांशी (8), हिमांक (6) आणि मानसी (4) अशी मृत मुलांची नावे आहेत. सर्व सख्खे भाऊ बहिणी आहेत. चारही मुलांचे मृतदेह पाहून आई शिवदेवीसह कुटुंबातील सर्वजण हताश झाले.

आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचल्यावर तेही रडायला लागले आणि अस्वस्थ झाले. अपघाताची माहिती बारसगवार पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलीस ठाण्याचे प्रभारी दिलीप प्रजापती यांनी घटनास्थळ गाठून तपास करून आवश्यक कारवाई केली.

मयंक (9), हिमांशी (8), हिमांक (6) आणि मानसी (4) अशी मृत मुलांची नावे आहेत. सर्व सख्खे भाऊ बहिणी आहेत. चारही मुलांचे मृतदेह पाहून आई शिवदेवीसह कुटुंबातील सर्व जणांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचल्यावर तेही रडायला लागले आणि अस्वस्थ झाले. अपघाताची माहिती बारसगवार पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

SCROLL FOR NEXT