जौनपूरमध्ये चिनी मांजामुळे डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू
संक्रांतीच्या काळात पतंग उडवताना घडलेला गंभीर अपघात
सरकारची बंदी असूनही चिनी मांजाची अवैध विक्री सुरू
समीर हाश्मी यांच्या निधनाने कुटुंबावर शोककळा
संक्रांतीच्या काळात आकाशात पतंगांची शर्यत लागते. मात्र या शर्यतीत जर चिनी मांजा वापरला तर तो कोणाचातरी जीव घेऊ शकतो. अशातच आता चिनी मांजाने एका डॉक्टरचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशातील जैनपूरमध्ये लाईन बाजार पोलिस स्टेशन परिसरातील पछतिया गावाजवळील प्रसाद इंटरनॅशनल स्कूलसमोर सदर घटना घडली. घटना घडताच संबंधित व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा जीव गेला. मृत डॉक्टरांचे नाव समीर हाश्मी हे असे आहे. ते एक ऑर्थोपेडिक सर्जन होते.
मिळालेल्या माहितीनुसार, केरकत कोतवाली परिसरातील शेखजादा येथे त्यांचे एक क्लिनिक होते आणि ते फिजिओथेरपी करत असत. बुधवारी सकाळी ते डॉक्टरांना भेटण्यासाठी जौनपूर जिल्हा रुग्णालयात बाईकवरून आले होते. परत येताना प्रसाद इंटरनॅशनल स्कूलजवळ अचानक ते पतंगाच्या चिनी मांजामध्ये अडकले. मांज्यात अडकताच ते खाली कोसळले आणि रक्तस्त्राव झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी समीर हाश्मी यांना परिसरातील नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयात मृतदेहाची ओळख पटल्यानंतर काही वेळातच समीरच्या कुटुंबाला तिथे बोलावण्यात आले.
सध्या या प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांकडून कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. आता या प्रकरणात पोलिस काय कारवाई करतात हे पाहावे लागेल. दरम्यान चिनी मांजावर सरकारने बंदी घातली असली तरी आजही छुप्या पद्धतीने त्याची खरेदी विक्री सुरु आहे. समीर यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.