१०३ वर्षांच्या गंगाबाई साखरे यांना मृत समजून अंत्यविधीची तयारी
सोशल मीडियावर निधन वार्ता देखील शेअर
अंत्यसंस्काराआधीच आजींनी श्वास घेतला
कुटुंबीयांमध्ये आनंद
संपूर्ण परिसरात आश्चर्य
जगात अनेकजण मृत्यूशी झुंज देत आहेत. आपला काळ कधी जवळ येईल याची देखील त्यांना कल्पना नसावी. या काळाला टक्कर देण्यासाठी चहू बाजुंनी त्यांची लढाई सुरु आहे. मात्र दुसरीकडे तब्बल दोन महिन्यांपासून बेड रेस्ट असलेल्या, दोन चमचे पाण्यावर जिवंत असलेल्या एका आजींचा मृत्यू झाला. इकडे कुटुंबीयांनी नातेवाईकांना निरोप दिला, घरापुढे मंडप टाकला, मैतीचे सामान आणुन अंत्यविधीचा वेळ ठरवल्या गेला, सोशल मिडीयावर निधन वार्ता शेअर करण्यात आली, अंत्यविधीच्या तयारीला सुरुवात केली, इतक्यात अचानक आजींनी पाय हलवले आणि कुटुंबियांच्या जीवात जीव आला. या आजीचं नाव गंगाबाई सावजी साखरे, वय १०३ वर्ष असे असुन त्या मुळच्या रामटेक शहराजवळच असलेल्या चारगाव येथील आपल्या मुलीकडे राहातात.
गंगाबाईच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार गंगाबाई ह्या तब्बल दोन महिन्यांपासून बेड रेस्ट आहे. दररोजचे दोन चमचे पाणी यावर त्या जिवंत आहेत. १२ जानेवारीला दुपारी पाच वाजता अचानक गंगाबाईंच्या शरीराच्या अवयवांच्या हालचाली बंद पडल्या. त्या मृत झाल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले व त्यांनी अंत्यविधीच्या प्रक्रियेला सुरुवात केली. गंगाबाईंना नवीन लुगडं घालण्यात आले, त्यांचे हाताचे व पायाचे बोटं बांधण्यात आले, नाकात कापूस कोंबण्यात आला.
कुटुंबियांना फोनवर माहिती देण्यात आली, सोशल मीडियावर निधनाची वार्ता पसरविण्यात आली, घरापुढे मंडप टाकण्यात आला, खुर्च्या ठेवण्यात आल्या, घरी पाहुणे येण्याची संपूर्ण तयारी करण्यात आली, दुसऱ्या दिवशी म्हणजे १३ जानेवारीला सकाळी दहा वाजताचा वेळ अंतयात्रेचा ठरवण्यात आला, मैतीचे सामान आणण्यात आले, शववाहिनी सांगण्यात आली. एवढी सर्व कामे आटोपवल्यावर घरी लोकं जमले असता, सायंकाळी ७ वाजता दरम्यान अचानक गंगाबाईंनी आपल्या पायाची बोटे हलवली. गंगाबाईंचा नातू राकेश साखरे याच्या लक्षात येताच त्याने हाताचे व पायाची बांधलेली बोटे सोडायला लावली व नाकात कोंबलेला कापूस काढताच गंगाबाई जोराने श्वास घ्यायला लागल्या व येथे एकच गोंधळ उडाला. अनेकांचा यावर विश्वासच बसेना.
गंगाबाईंच्या निधनाची वार्ता मिळताच आप्त मंडळी, नातेवाईक दूर दूरच्या गावावरून रामटेकसाठी निघाले. जम्मू काश्मीर वरून पुतण्या निघाला तर बालाघाट वरून दुसरा पुतन्या रामटेक ला येऊन पोहोचला. तर इतर नातेवाईक मंडळी सुद्धा येऊन पोहोचली. काही लोकांनी सुट्ट्यांचे अर्ज टाकले. तर १३ जानेवारीला लोकं चक्क हार घेऊन घरी आले व गंगाबाईंना जिवंत पाहताच चक्क झाले. गंगाबाई जिवंत असल्याची माहिती सर्वांना देण्यात आली. शव वाहिनी रद्द करण्यात आली, पेंडॉल काढण्यात आला व खुर्च्या परत करण्यात आल्या. गंगाबाईंच्या जिवंत असल्याने कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले तर दुसरीकडे या चमत्काराने लोक आवाक झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.