
अनेकांना सतत नाकात बोट घालण्याची सवय असते. मात्र तुम्हाला माहितीये का, अनेकांची ही सवय फार धोकादायक ठरू शकते. ही सवय इतकी धोकादायक ठरते की संबंधित व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो. जर तुम्हालाही नाकात बोट घालण्याची सवय असेल तर ती ताबडतोब थांबवा, अन्यथा ते गंभीर ठरू शकतं. मुळात ही एक वाईट सवय मानली जाते. ज्याला वैद्यकीय भाषेत राइनोटिलेक्सोमॅनिया म्हटलं जातं.
नाकात बोट घालण्याची ही सवय तुम्हाला आजारी पाडू शकते. यामुळे मृत्यूचा धोका देखील असू शकतो. अलिकडेच एका चिनी माणसासोबत असंच काहीसे घडलं. मुळात हा व्यक्ती जो मृत्यूपासून थोडक्यात बचावला. नाक बोट घालण्याच्या सवयीचे धोके आणि संपूर्ण प्रकरण जाणून घेतलं पाहिजे.
हातातील जंतू नाकात जाऊ पसरू शकतात. ज्यामुळे नाकात आणि संसर्ग होण्याचा धोका असतो.
नखं नाकाच्या आतील भागाला नुकसान पोहोचवू शकतात. ज्यामुळे नाकातील टिश्यू कापण्याचा धोका असतो, बॅक्टेरिया वाढू शकतात.
असं केल्याने स्टॅफिलोकोकस नावाच्या जीवाणूंचा प्रसार होण्याचा धोका असतो ज्यामुळे न्यूमोनिया किंवा हाडांचे आजार होऊ शकतात. हे जीवाणू मेंदूपर्यंत पोहोचू शकतात आणि डिमेंशिया आणि अल्झायमरचा धोका वाढवू शकतात.
नाकामध्ये जखम येऊन सूज येऊ शकते.
एका चिनी माणसाला वारंवार नाकात बोट घालण्याची सवय होती, त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरील धमनी फुटली आणि त्याला आपत्कालीन शस्त्रक्रिया करावी लागली. या माणसाच्या पत्नीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून ही माहिती दिली होती. शांक्सी प्रांतातील शियानयांग शहरातील हा माणूस नेहमीच नाकात बोट घालत असे.
हा व्यक्ती वारंवार त्याच्या बोटाने त्याच्या नाकाला स्पर्श करत असे. अलिकडच्या काळात असं केल्याने त्याला खूप रक्तस्त्राव होऊ लागला. अनेक प्रयत्न केल्यानंतर देखील तो थांबता नाही. अशावेळी त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं, ज्याठिकाणी डॉक्टरांनी त्याला सांगितलं की, धमनी फुटली आहे आणि आपत्कालीन शस्त्रक्रिया करावी लागेल.
आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, नाक खाजवू नका किंवा बोटं सतत घालू नका. यामुळे संसर्गाचा गंभीर धोका आहे. यामुळे आणखी अनेक समस्या उद्भवू शकतात. या सवयीमुळे नाकाच्या श्लेष्मल त्वचेला गंभीर नुकसान होण्याचा धोका असतो. चिनी माणसाच्या बाबतीत, अनुनासिक पोकळीतील रक्तवाहिन्या किंवा ऊतींना गंभीर नुकसान झालं. शिवाय धमनीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. अधिक गंभीर प्रकरणांमध्ये मृत्यू होण्याचाही धोका संभवतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.