Uttar Pradesh News Saam Tv
देश विदेश

Uttar Pradesh News: आंघोळ न करता आलेल्या मुलांना शिक्षकाची क्रूर शिक्षा, थर थर कापत होती मुलं, VIDEO आला समोर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Uttar Pradesh Bareilly Students Viral Video:

उत्तर प्रदेशमधील एका शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे. शाळेत बिना अंघोळ करुन आल्याने विद्यार्थ्यांना थंड पाण्याच्या हौदात अंघोळ करण्याची शिक्षा दिली आहे. बरेली जिल्ह्यातील फरीदपूर भागातील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये ही घटना घडली आहे. या संपूर्ण घटनेने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत. या काळात सकाळी सकाळी आंघोळ करायला विद्यार्थी कंटाळा करतात आणि आंघोळ न करताच शाळेत जातात. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये एका शाळेत आंघोळ न करता गेल्याने विद्यार्थ्यांना भयानक शिक्षा भोगायला लागली आहे. मुख्याध्यापकांनी बिना अंघोळ करता शाळेत आल्याने ५ विद्यार्थ्यांना कुडकडत्या थंडीत पाण्याच्या हौदात आंघोळ करण्याची शिक्षा दिली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

विशेष म्हणजे, मुख्याध्यापकांनीच हा व्हिडिओ स्वतः रेकॉर्ड केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. रणविजय सिंह असे मुख्यध्यापकाचे नाव आहे. सकाळी शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना कुणी कुणी आंघोळ केली, असे विचारण्यात आले. त्यावेळी ५ विद्यार्थ्यांनी आंघोळ न केल्याचे समजले. यानंतर मुख्यध्यापकांनी मुलांना हौदात अंघोळ करायला लावली.

मात्र सकाळची वेळ आणि त्यात थंडीचे दिवस त्यामुळे थंड पाण्यात मुलं कुडकडत होते. सध्या बरेलीतील तापमान १८ अंश सेल्सियसवर आहे. तरीदेखील शिस्तीच्या नावाखाली मुख्याध्यापकांनी मुलांना ही शिक्षा दिली. या कृत्याचा निषेध अनेकांकडून केला जात आहे. मुख्याध्यापकांच्या या कृतीची त्यांना शिक्षा मिळायला हवी अशी मागणी देखील सोशल मीडियावर अनेकांकडून होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

SCROLL FOR NEXT