Dinosaur Egg News: खळबळजनक! वर्षानुवर्षे कुलदेवता समजून करत होते पूजा; देव नाही तर ते निघाले डायनासोरचे अंडे

Madhya Pradesh News: गावातील ४० वर्षीय वेस्ता मंडलोई यांना शेतात खोदकाम करताना एक गोलाकार वस्तू सापडली होती. सापडलेला गोलाकार दगड म्हणजे आपलं कुलदैवत आहे.
Dinosaur Egg News
Dinosaur Egg NewsSaam TV
Published On

Dinosaur Egg in Madhya Pradesh:

प्रत्येक समाजात प्रत्येक धर्मात आपल्या रक्षणासाठी किंवा मानसिक समाधान मिळावे यासाठी सर्वजण देवी देवतांची पूजा करतात. प्रत्येक गावानुसार त्या त्या ठिकाणी वेगवेगळे कुलदैवत असते. आपल्या कुलदैवताची पूजा लोकं पिढ्यांपिढ्या करत आले आहेत. अशात तुमच्या घरी असलेलं कुलदैवत हे देव नसून डायनासोरचे अंडे आहे असे झाले तर? कल्पनेच्या पलिकडे वाटले तरी प्रत्यक्षात अशी घटना घडली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dinosaur Egg News
Egg Price Rise : थंडी वाढली, अंडी महागली! डझनमागे किती रुपये मोजावे लागणार?

मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यातील पाडल्या या गावात ही घटना घडली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत माहिती दिली आहे. गावातील ४० वर्षीय वेस्ता मंडलोई यांना शेतात खोदकाम करताना एक गोलाकार वस्तू सापडली होती. सापडलेला गोलाकार दगड म्हणजे आपलं कुलदैवत आहे, असं त्यांना वाटू लागलं. त्यांनी या दगडाची देवासारखी पूजा करण्यास सुरूवात केली.

कक्कड भैरव

त्यांनी या देवाचं नाव कक्कड भैरव असे ठेवलेय. हेच आपले कुलदैवत आहे असा समज येथील व्यक्तींनी कारून घेतलाय. या गावातील काही ठरावीक जातीच्या व्यक्ती या देवाची पूजा करतात. कक्कड भैरव कुलदैवत आपल्या शेतीचे आणि पाळीव प्राण्यांचे रक्षण करतो असा येथील गावकऱ्यांचा समज आहे.

गावात काही दिवसांपूर्वी बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलेओसायन्स (बीएसआयपी) लखनऊचे तज्ज्ञ संशोधन करत होते. त्यावेळी गावात असलेल्या या कुलदैवताची त्यांना माहिती मिळाली. त्यांनी कुलदैवत म्हणून ज्या दगडाची पूजा केली जात होती त्याचे निरिक्षण केले. त्यावेळी हा दगड नसून डायनासोरच्या टायटॅनो-स्टॉर्क प्रजातीचे अंडे असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यानंतर मध्य प्रदेश वन विभागाचे अधिकारी देखील येथे पोहोचले आणि गावकऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. पॅलेओन्टोलॉजी तज्ज्ञ विशाल वर्मा यांनी सांगितले की, धार जिल्ह्यात १२० किलोमीटर परिसरात आतापर्यंत सुमारे २५६ डायनासोरची अंडी सापडली आहेत.

Dinosaur Egg News
Nagar Crime News : 'ते' प्रकरण पोलिस निरिक्षकासह कर्मचा-यांना भाेवलं, गुन्हा दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com