Nagar Crime News : 'ते' प्रकरण पोलिस निरिक्षकासह कर्मचा-यांना भाेवलं, गुन्हा दाखल

या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई होणं गरजेचं आहे.
court orders to book police inspector along with two in nagar
court orders to book police inspector along with two in nagarsaam tv
Published On

- सचिन बनसाेडे

Nagar News :

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विवाह सुरू असल्याची तक्रार करणा-या तरूणालाच पोलीसांनी मारहाण करत खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान न्यायालयाच्या आदेशानंतर आता पोलीस निरीक्षकासह दोन पोलिस कर्मचा-यांवर गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. (Maharashtra News)

श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव परीसरात फेब्रुवारी 2023 मध्ये अल्पवयीन मुलीचा विवाह लावला जात असल्याची माहीती मिळाल्यानंतर सामाजिक भावनेतून सुरज यादव या तरूणाने 112 नंबरवर फोन करून याबाबातची दिली. तसेच तक्रार देखील केली होती.

court orders to book police inspector along with two in nagar
MOVEMENT FOR INDEPENDENT VIDARBHA STATE: 'वेगळ्या विदर्भासाठी 'करू किंवा मरू..!'

यानंतर पोलीसांनी विवाहस्थळी न जाता थेट तरूणाचे घर गाठले आणि त्याला खोटी तक्रार करतो का? तुला काय देणं घेणं आहे? या भानगडीत पडू नकोस असं म्हणत बेदम मारहाण केली. सुरजचा मित्र ओंकार साळवे यालाही पोलीस ठाण्यात आणून दोघांना मारहाण करण्यात आली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलीस काॅन्स्टेबल हबीब शेख, चांद पठाण यांच्यासह तात्कालीन पोलीस निरीक्षकांनी मारहाण केल्याने तरूणाला रूग्णालयात दाखल करावे लागले होते. या प्रकरणाची फिर्याद घेतली जात नसल्याने सूरजने न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयाचा आदेश

न्यायालयाने दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह पोलीस निरीक्षकावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा असा आदेश दिल्याचे वकील राजेश्वर बारस्कर यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

यानूसार पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, पोलिस कर्मचारी चांद पठाण तसेच हबीब शेख यांच्यावर पाेलिस ठाण्यात गुन्हा नाेंदविण्यात आला आले.

court orders to book police inspector along with two in nagar
Success Story: दुष्काळी भागात बहरली स्ट्रॉबेरी; करमाळ्यातील इंजिनिअर युवकानं करुन दाखवलं

खरंतर पोलीसांनी तक्रार करणा-या तरूणाच्या म्हणण्यानुसार अल्पवयीन मुलीचा विवाह सुरू आहे का? याची खातरजमा करायला हवी होती. मात्र आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत होत असलेल्या अल्पयीन मुलीच्या लग्नाविषयी तक्रार करतोय या भावनेतून त्याला केलेली मारहाण बेकायदेशीर असून या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई होणं गरजेचं आहे.

Edited By : Siddharth Latkar

court orders to book police inspector along with two in nagar
Beed News : 15 कोटींच्या अग्रीम विम्याची प्रतिक्षा, बीडचे 50 हजार शेतकरी चिंतातूर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com