Mathura 5 Members Of Family End Life Saam Tv
देश विदेश

Shocking: भिंतीवर कारण लिहिले, व्हिडिओही काढला; आई-वडील अन् ३ मुलांची सामूहिक आत्महत्या

Mathura 5 Members Of Family End Life: मथुरामध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांनी सामूहिक आत्महत्या केली. दुधात विष टाकून ते सर्वांनी प्यायले. आत्महत्येपूर्वी त्यांनी भिंतीवर सुसाईड नोट लिहिल होती.

Priya More

Summary -

  • मथुरामध्ये एका घरात कुटुंबातील पाच जण मृतावस्थेत आढळले

  • पाचही जणांनी सामूहिक आत्महत्या केली

  • दुधामध्ये विष मिक्स करून ते प्यायले

  • घटनास्थळी सुसाईड नोट आणि व्हिडीओ पोलिसांना सापडले

उत्तर प्रदेशच्या मथुरामध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली. याठिकाणी एकाच कुटुंबातील ५ जणांनी सामूहिक आत्महत्या केली. नवरा-बायको आणि तीन मुलांचे मृतदेह घरामध्ये आढळून आले. आत्महत्या करण्यापूर्वी भिंतीवर सुसाईड नोट लिहिली आणि व्हिडीओ देखील काढले होते. या घटनेमुळे मथुरामध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाचही जणांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मथुरातील खपरपुर गावात ही घटना घडली. या ठिकाणी एका घरामध्ये कुटुंबातील ५ सदस्यांचे मृतदेह आढळून आले. मुकेश, त्याची बायको आणि ३ मुलं एकाच खोलीमध्ये मृतावस्थेत आढळून आले. शेजारीच मुकेशचा भाऊ राहतो. त्याने सकाळी घराचा दरवाजा ठोठावला पण कुणीच काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याने दरवाजा तोडल्यानंतर आतमध्ये पाचही जणांचे मृतदेह आढळून आले. हे चित्र पाहून त्याला मोठा धक्का बसला.

त्यानंतर त्याने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाचही जणांचे मृतदेह ताब्यात घेत त्यांनी शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांना घटनास्थळी भिंतीवर आणि एका वहिमध्ये लिहिलेली सुसाइड नोट सापडली. त्याचसोबत आत्महत्या केलेल्या मुकेशच्या मोबाइलमध्ये आत्महत्यापूर्वी तयार केलेला व्हिडीओ देखील सापडला. व्हिडीओमध्ये त्याने आत्महत्येमागचे कारण सांगितले. मुकेश आणि त्याच्या बायकोने दूधातून विष मिक्स केले आणि हे दूध सर्वजण प्यायले. या घटनेत पाचही जणांचा मृत्यू झाला.

या सामूहिक आत्महत्येमुळे गावात खळबळ उडाली. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिस गावाकऱ्यांची चौकशी करत आहेत. मुकेशच्या घरी नेहमी येणारे आणि जाणाऱ्यांचा देखील जबाब नोंदवून घेतला जात आहे. मुकेशचे कुटुंबीय आर्थिक अडचणीत होते का? की आत्महत्येमागे आणखी काही कारण आहेत का? याचा तपास पोलिस करत आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर नेमकं कारण समोर येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र एटीएसने मुंबईत संशयित आयसिस ऑनलाइन प्रचार साहित्य संदर्भात टाकली धाड

Gold Price: सोन्याच्या दरवाढीचा स्फोट होणार, सोनं ३ लाखांवर जाणार; तज्ज्ञांचा धडकी भरवणारा अंदाज

क्रिकेट विश्वावर शोककळा, दिग्गज खेळाडूच्या वडिलांचं निधन

Wednesday Horoscope: उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळतील, कामाचा ताण जाणेल, वाचा बुधवारचं राशीभविष्य

Rajya Sabha: भाजपचे अध्यक्ष आता खासदार होणार, 'या' राज्यातून मिळाली उमेदवारी, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT