Accident  saam tv
देश विदेश

Uttar Pradesh Accident : होळीच्या दिवशी भीषण अपघात; ट्रॅक्टर आणि ट्रकमध्ये धडक, चौघांचा मृत्यू

Uttar Pradesh Accident News : उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये होळीच्या दिवशी भीषण रस्ते अपघात झाला आहे. या रस्ते अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रक आणि ट्रॅक्टरची धडक होऊन झालेल्या अपघातात चार जणांना जीव गमवावा लागला आहे.

Vishal Gangurde

Uttar Pradesh Accident :

उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये होळीच्या दिवशी भीषण रस्ते अपघात झाला आहे. या रस्ते अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रक आणि ट्रॅक्टरची धडक होऊन झालेल्या अपघातात चार जणांना जीव गमवावा लागला आहे. तर १० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती हाती आली आहे. (Latest Marathi News)

पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या रामपूरला शनिवारी रात्री धर्मपूर गावात ट्रक आणि ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघाताची घटना घडली. पोलिसांकडून ट्रक चालकाचा शोध सुरु आहे. या अपघातामधील मृतांची ओळख पटली आहे.

कविता (18), टिंकू यादव उर्फ ​​रवि (18), रामवती (45) आणि सावित्री (30) अशी मृतांची नावे समोर आली आहे. तर या अपघातामधील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. सध्या या जखमींची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

नेमका अपघात कसा झाला?

पोलिसांच्या माहितीनुसार, मृतक मुदराबादमधून बरेलीत परतत होते. त्यावेळी एका भरधाव ट्रॅकने ट्रॅक्टरला धडक दिली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला.

तत्पूर्वी, दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये भीषण रस्ते अपघाताची घटना घडली होती. या अपघातात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तीन पॉलिटेक्निकचे विद्यार्थी सकाळच्या सुमारास कॉलेजला सायकलने जात होते. त्यावेळी एका भरधाव बसने त्यांना धडक दिली. या अपघातात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

तर बसमधील प्रवासीही जखमी झाले. या घटनेनंतर पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. त्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेत मृत पावललेल्या विद्यार्थ्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निवडणुकांमुळे नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन १० दिवस पुढे जाण्याची शक्यता

HSC-SSC Exam : दहावी-बारावीची परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय

Mix Veg Bhaji: मुलं सगळ्या भाज्या करतील फस्त, थंडीत चहाबरोबर करा कुरकरीत भजीचा बेत नक्की करा

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नियमित प्या 'हे' सूप, रेसिपी आहे अगदी सिंपल

Maharashtra Politics : रोहित पवारांना महायुतीच्या मांडीवर बसण्याची घाई, अजित पवारांचे आमदार असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT