Barabanki Train Accident Saam TV
देश विदेश

Uttar Pradesh News: रील्सच्या नादात गमावला जीव, भरधाव ट्रेनच्या धडकेत १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Barabanki Train Accident: रेल्वे ट्रॅकजवळ रील्स तयार करणाऱ्या मुलाला ट्रेनने उडवल्याची (reels take Boy life) घटना समोर आली आहे.

Priya More

Barabanki Boy Death News:

आजच्या तरूण पिढीला सोशल मीडियाचे (Social Media) अक्षरश: वेड लागलं आहे. रील्स अथवा व्हिडीओ तयार करू ते सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी आजकालचे तरुण काहीही करायला तयार असतात. अगदी उंचावरून उडी मारणं असो किंवा रेल्वे ट्रॅकवरून चालणं असू त्यांना कशाचीच भीती वाटत नाही. अनेकांना रिल्सच्या नादात आपला जीव देखील गमवावा लागला आहे. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा समोर आला आहे तो म्हणजे उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथे घडलेल्या घटनेमुळे.

याठिकाणी रेल्वे ट्रॅकजवळ रील्स तयार करणाऱ्या मुलाला ट्रेनने उडवल्याची (reels take childs life) घटना समोर आली आहे. या घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झाला. या मुलाच्या मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ (Viral Video) समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जहांगीराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील टेरा दौलतपूर गावात राहणाऱ्या फरमानचा (१४ वर्षे) रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झाला. मोबाइलवर रील्स तयार करत असताना त्याला ट्रेनने उडवले. फरमान गुरुवारी आपल्या चार मित्रांसोबत शहापूर शहरात बारावफत मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी गेला होता. याचदरम्यान, दामोदरपूर गावाजवळ रेल्वे ट्रॅकवर फरमान मित्रांसोबत मोबाईलवर रील्स तयार करण्यासाठी गेला.

रील तयार करत असताना फरमान रेल्वे ट्रकच्या शेजारून चालत होता. त्याचवेळी मागून येणाऱ्या दरभंगा एक्स्प्रेसने त्याला जोरात धडक दिली. या घटनेत फरमानचा जागीच मृत्यू झाला. रेल्वे पोलिसांनी फरमानचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टम केल्यानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. याप्रकरणाची नोंद करत पोलीस फरमानच्या मित्रांची चौकशी करत आहेत.

आता या घटनेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी फरमानच्या मृत्यूचा धक्कादायक लाइव्ह व्हिडीओ समोर आला आहे. या ३० सेकंदाच्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, फरमान ट्रेनचा आवाज येत असून देखील रेल्वे ट्रॅकजवळ गेला. यावेळी तो मोबाइलमध्ये व्हिडीओ तयार करण्यात दंग असल्याचे दिसत आहे. काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं भरधाव एक्स्प्रेसने फरमानला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरमानला रील तयार करण्याची खूपच आवड होती. तो नेहमी आपल्या मोबाईलमध्ये फोटो आणि रील्स तयार करायचा. हे रील्स तयार करणंच फरहानला महागात पडले आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे फरहानच्या कुटुंबींना मोठा धक्का बसला. सध्या पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. तसंच तरूणांना अशाप्रकारचे जीवघेणे व्हिडीओ तयार करू नका असे आवाहन करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

Ajit Pawar Speech : अजित पवारांनी जाहीर कबुल केलं; बारामतीकरांसमोर चूक मान्य करत म्हणाले...VIDEO

SCROLL FOR NEXT