No Fish No Wedding Saam Tv
देश विदेश

Uttar Pradesh News: मासे नाही तर लग्न नाही! जेवणाच्या मेन्यूमध्ये वऱ्हाडी संतापले, भरमंडपात एकमेकांना तुडवलं; ६ जण जखमी

No Fish No Wedding: त्तर प्रदेशातील देवरिया येथे एका लग्नात जेवणाच्या मेन्यूमध्ये मासे नसल्यामुळे तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये ६ जण जखमी झाले आहेत.

Priya More

लग्नसोहळा म्हटलं तर जेवण आलेच. जेवणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ ठेवले जातात. बऱ्याचदा आपण लग्नसोहळ्यामध्ये जेवणावरून भांडण झाल्याचे अनेक प्रकार आपण पाहिले आहेत. जेवणामध्ये एखादा पदार्थ न मिळाल्यामुळे थेट एकमेकांना लाथाबुक्यांनी मारहाण केल्याच्या घटना तुम्ही देखील पाहिल्या असतील. अशामध्ये उत्तर प्रदेशातील देवरिया येथे एका लग्नात जेवणाच्या मेन्यूमध्ये मासे नसल्यामुळे तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये ६ जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी अभिषेक शर्मा नावाच्या तरुणाचे सुषमा नावाच्या तरुणीसोबत लग्न होते. उत्तर प्रदेशच्या देवरियाच्या आनंदनगर गावात हे लग्न होते. नवरदेव लग्नासाठी आनंदनगर वरात घेऊन आला होता. वरातीमध्ये मोठ्यासंख्येने नवरदेवाचे पाहुणे सहभागी झाले होते. लग्नसोहळ्यामध्ये जेवणावरून झालेल्या भांडणात नवरीच्या कुटुंबीयांना नवरदेव आणि त्याच्या नातेवाईकांनी मारहाण केली. या घटनेमध्ये ६ जण जखमी झाले आहेत.

वरमाळानंतर नवरदेवाचे नातेवाईक जेवायला गेले. शाकाहारी जेवण पाहून त्यांना राग आला आणि त्यांनी भांडण सुरू केले. यानंतर नवरदेव अभिषेक शर्मा आणि त्याच्या नातेवाईकांनी नवरीच्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना मारहाण केली. या मारहाणीमध्ये ६ जण जखमी झाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेमुळे लग्नाच्या ठिकाणी गोंधळाचे वातावरण होते. मासे नाही तर लग्न नाही असे म्हणत नवरदेवाकडील नातेवाईकांनी राडा केला.

व्हायरल होणाऱ्या या घटनेच्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, लग्नसोहळ्याच्या ठिकाणी नवरा-नवरीचे कुटुंबामध्ये वाद झाला आहे. दोन्ही बाजूची लोकं एकमेकांना मारहाण करत आहेत. लाथाबुक्यांनी, तर खुर्च्या उचलून ते एकेमकांना धुवून काढताना दिसत आहे. यामध्ये महिलांचा देखील समावेश आहे. नवरदेव नवीराला 'मासे का नाही?' असे विचारत तिच्या तोंडावर चापट मारतो. नवरीची आई मीरा शर्मा म्हणाली, 'त्यांनी मला आणि माझ्या पतीलाही मारहाण केली. नवरदेवाकडील १० लोकांनी आम्हाला मारहाण केली आणि आमच्या कुटुंबातील सदस्यांना जखमी केले.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT