Maha Kumbh Mela Fire Saam Tv
देश विदेश

Maha Kumbh Mela: महाकुंभ मेळ्यात पुन्हा अग्नितांडव! छतनाग घाटाजवळील तंबूंना भीषण आग, भाविकांमध्ये भीतीचे वातावरण

Maha Kumbh Mela Fire Update: महाकुंभ मेळ्यामध्ये चेंगराचेंगरीची घटना ताजी असतानाच आता पुन्हा आग लागल्याची घटना घडली. यामध्ये १२ तंबू जळून खाक झालेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Priya More

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये पुन्हा भीषण आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या आगीमध्ये १२ पेक्षा अधिक तंबू जळून खाक झाले आहेत. छतनाग घाटजवळील नागेश्वर घाट सेक्टर २२ मधील टेंट सिटीमध्ये ही आग लागली. हा घाट झुंसीच्या दिशेने जाणाऱ्या छतनागजवळ महाकुंभ मेळ्याच्या काठावर आहे.

खासगी कंपनीने उभारलेल्या वैदिक टेंट सिटीमध्ये ही आग लागली. या आगीमध्ये कोणतिही जीवितहानी झाली नाही. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

याआधी १९ जानेवारीला महाकुंभ मेळ्यात आग लागली होती. गोरखपूरमधील गीता प्रेसच्या कॅम्पमध्ये आग लागली होती. त्यानंतर दीडशेहून अधिक तंबू जळून खाक झाले होते. शास्त्री पुलाजवळ सेक्टर १९ मध्ये गीता प्रेसच्या कॅम्पला ही आग लागली होती. छोट्या गॅस सिलेंडरमधून झालेल्या गळतीमुळे ही आग लागली असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. पण गीता प्रेसच्या लोकांनी ही आग बाहेरून लागल्याचे कारण सांगितले होते.

मागच्या वेळी आग लागली होती तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रयागराजमध्ये होते. आज जेव्हा ही आग लागली तेव्हा राज्याचे दोन्ही मोठे अधिकारी, मुख्य सचिव मनोज कुमार सिंह आणि डीजीपी प्रशांत कुमार महाकुंभ मेळा परिसरात होते. कालच्या चेंगराचेंगरीमागील कारणांचा शोध घेण्यासाठी दोन्ही अधिकारी दाखल झाले आहेत. या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला होता. तर ६० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. ३६ जणांवर वैद्यकीय महाविद्यालयातच उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : "तुला माझ्यासोबत झोपावं लागेल..."; दिग्दर्शकाची प्रसिद्ध अभिनेत्रीकडे घाणेरडी मागणी

DA-DR Hike : सणासुदीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार डबल खूशखबर?; DA वाढीसह 'ही' घोषणा लवकरच, पाहा अपडेट

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये स्टेशन मास्तरांवरील हल्ल्यांविरोधात रेल्वे कर्मचारी असोसियन आक्रमक

Kolhapur ऊस दरवाढीवरून शेतकऱ्यांचा आक्रोश, २४ तासांपासून महामार्ग अडवला; वाहतूक खोळंबली, भाजीपाला ४० टक्क्यांनी महागला

Gold Rate : सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण, १० तोळं सोनं ₹१०,३०० नी स्वस्त, तुमच्या शहरातील ताजे दर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT