Husband Wife Dispute Yandex
देश विदेश

Husband Wife Dispute: बायको उशिरा उठते, ऑफिसला उपाशीपोटीच जावं लागतं; वैतागलेला नवरा थेट पोलीस ठाण्यातच गेला

Wife Sleep late Husband Appeal To Police: बायको उशिरा झोपते म्हणून एक व्यक्ती थेट पोलीस ठाण्यात पोहोचला आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधून समोर आली आहे.

Rohini Gudaghe

आज काल अगदी छोट्या छोट्या कारणांमुळे नवरा बायकोमध्ये वाद (Husband Wife Clash) होत असल्याचं समोर येत आहे. अगदी क्षुल्लक कारणांवरून जोडपे पोलीस ठाण्यात पोहचत आहेत. कधी कधी त्यांना समजावून प्रकरण मिटवलं जातं. तर कधी कधी त्यांच्या वादामुळे गुन्हे दाखल करावे लागतात, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) मथुरा येथून असंच एक प्रकरण समोर आलं आहे. नवऱ्याची तक्रार ऐकून ठाण्यातील पोलीस अधिकारीच चक्रावले आहेत. या व्यक्तीने त्याच्या बायकोविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याची बायको रात्री उशिरापर्यंत फोन वापरते. त्यामुळे सकाळी उशिरा उठते. बायको सकाळी उशिरा उठल्यामुळे त्याला उपाशीपोटीच कामावर जावं लागतं. बायको सकाळी झोपेतून उठेपर्यंत नवरा ऑफिसला जातो.

त्यामुळे कंटाळून बायकोपासुन वेगळे होण्यासाठी या व्यक्तीने पोलीस ठाणे गाठले आहे. त्याने पोलिसांना बायकोपासुन सुटका पाहिजे असल्याची विनंती केली आहे. त्याने म्हटलंय की, वेळेवर जेवण मिळत नाही. त्यामुळे माझ्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे जी मला वेळेवर जेवण देत नाही, अशा बायकोसोबत राहायचं नाही, अशी तक्रार त्याने केली (Husband Wife Dispute) आहे. या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर पोलिसांनी आधी याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. त्यानंतर या जोडप्याला समजावून घरी पाठवलं आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी टीव्ही नाईन हिंदीला दिलेल्या माहितीनुसार आजकाल अशा अनेक घटना समोर येत आहेत. ज्यामध्ये क्षुल्लक कारणावरून नवरा बायको पोलीस ठाण्यात जात आहेत. अनेकदा त्यांना समजावून प्रकरणं (Wife Sleep late) मिटवली जातात, तर काही प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करावं लागत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार १५०० प्रकरणं समजावन मिटवली आहेत, तर ४०० प्रकरणांमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीस अधिकाऱ्यांच्या दिलेल्या माहितीनुसार, कधी भांडणामुळे तर कधी नवऱ्याला वेळ नसल्यामुळे बायकोने घर सोडल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. काही प्रकरण संवाद साधून सोडवली जातात. तर दोघांमध्ये सहमती नसल्यामुळे अनेकदा गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शिंदे गटाला हादरा, बड्या नेत्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

Eknath Shinde : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पडद्यामागं कोण होतं? एकनाथ शिंदे म्हणाले...VIDEO

Pune Ganeshutsav : पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीबाबत पोलिसांचा मोठा निर्णय

बलात्कार पीडितेला आरोपीच्या घरी पाठवलं, नराधमानं पुन्हा केले अत्याचार, बालकल्याण समितीच्या अध्यक्षांसह १० जणांवर गुन्हा

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी चुकूनही करु नये 'या' गोष्टी, अन्यथा...

SCROLL FOR NEXT