Uttarpradesh Shahjahanpur Accident Saamtv
देश विदेश

UP Road Accident: आक्रोश, किंकाळ्या अन् हाहाकार... ट्रक- टेम्पोचा भीषण अपघात; १२ भाविक जागीच ठार

Uttarpradesh Shahjahanpur Accident: हा अपघात इतका भयानक होता की रिक्षाचे अक्षरशः दोन तुकडे झाले. अपघातस्थळी विखुरलेले मृतदेह, त्यांच्या नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा काळीज पिळवटुन टाकणारा होता.

Gangappa Pujari

Shahjahanpur Road Accident:

उत्तरप्रदेशमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये ट्रक आणि टेम्पोमध्ये गुरूवारी पहाटे भयानक अपघात झाला. या अपघातात १२ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रस्त्यावर पडलेले मृतदेह, नातेवाईकांच्या किंचाळ्यांनी अवघा परिसर सुन्न झाल्याचे पाहायला मिळाले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, उत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) शाहजहांपूरमध्ये गुरूवारी पहाटे ट्रक आणि टेंम्पोमध्ये मोठा अपघात झाला. समोर आलेल्या माहितीनुसार शाहंजहापूर भागातील दमगडा गावचे काही लोक गंगेत स्नान करण्यासाठी ऑटोने फरुखाबाद येथील पांचाळ घाटाकडे रिक्षामधून जात होते.

यावेळी बरेली-फर्रुखाबाद महामार्गावर आल्हागंज येथील सुगुसुगी गावाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या ऑटोला धडक (Accident) दिली. ही धडक एवढी भीषण होती की ऑटोचा चक्काचूर झाला. त्यात प्रवास करणाऱ्या 12 भाविकांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये आठ पुरुष, तीन महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ट्रकच्या धडकेनंतर ऑटोमधील पाच-सहा लोक रस्त्यावर पडले होते. त्यांचा जीव वाचू शकला असता, मात्र अपघातानंतर ट्रक त्यांच्या अंगावरून गेला, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीसांसह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेल्याचेही सांगण्यात येत आहे.

दरम्यान, दाट धुक्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात इतका भयानक होता की रिक्षाचे अक्षरशः दोन तुकडे झाले. अपघातस्थळी विखुरलेले मृतदेह, त्यांच्या नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा काळीज पिळवटुन टाकणारा होता. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

SCROLL FOR NEXT