Uttar Pradesh News: हृदयद्रावक! थंडी लागू नये म्हणून आईनं खाटेखाली शेकोटी पेटवली; झोपलेल्या जुळ्या बहिणींचा होरपळून मृत्यू

Uttar Pradesh :उत्तरप्रदेशमध्ये एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. मैनपुरी जिल्ह्यात एका आगीत होरपळून ६ वर्षीय मुलींचा मृत्यू झाला आहे. या दोघीही जुळ्या बहिणी होत्या.
Shocking News
Shocking NewsSaam Tv
Published On

Uttar Pradesh Shocking News:

उत्तरप्रदेशमध्ये एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. मैनपुरी जिल्ह्यात एका आगीत होरपळून ६ वर्षीय मुलींचा मृत्यू झाला आहे. या दोघीही जुळ्या बहिणी होत्या. एकाचवेळी दोन्ही मुलींचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Latest News)

मैनपुरी जिल्ह्यातील औंछा शहरात ही घटना घडली आहे. रिद्धी-सिद्धी या दोन जुळ्या मुलींचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. गौरव उर्फ दिलीप कुमार, त्याची पत्नी आणि दोन मुली असा परिवार औंछा शहरात राहत होता. गौरव उर्फ दिलीप कुमार काही कामानिमित्त दुपारी घरातून बाहेर गेला होता. घरी पत्नी रजनी तिच्या सहा महिन्यांच्या जुळ्या मुलींना बेडवर झोपवत होती. यावेळी मुलींना थंडी लागू नये म्हणून तिने बेडखाली एका शेकोटी पेटवली होती. त्यानंतर रजनी आपल्या कामासाठी खालच्या खोलीत गेली.

काही वेळाने रजनीच्या घरातून धूर निघत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी आरडओरडा केली. त्यावेळी रजनी वरच्या खोलीत पोहचली. तेव्हा तिला धक्काच बसला. तिच्या दोन्ही मुलींना आगीने वेढलेले होते, असे तिने सांगितले. त्यानंतर रजनीने आरडाओरडा केला.

Shocking News
Ram Mandir Ayodhya: राम मंदिरावर वक्तव्य करणे टाळा, श्रद्धा दाखवा पण...'; PM मोदींकडून मंत्र्यांना कानमंत्र

रजनीचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहचले. त्यांनी आग विझवली. या आगीत रिद्धी- सिद्धी खूप जास्त भाजल्या होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळीच वाटेतच या दोघींचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. दोन्ही मुलींचा मृत्यू झाल्याने त्यांच्या आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Shocking News
Japan Earthqueake News : नववर्षात जपानला भूकंपाचा दुसरा मोठा धक्का

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com