Unseasonal Rain : महाराष्ट्रात हिवाळ्यात पावसाळा!; रात्री गारठवणारी थंडी, सकाळी पावसाच्या धारा

Pune News : काही भागात ढगाळ वातावरण असून येथेही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
Unseasonal Rain
Unseasonal RainSaam tv
Published On

पुणे : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागात आज सकाळी अवकाळी पाऊस (Rain) झाला आहे. पुणे, बारामती, सातारा, संभाजीनगर जिल्ह्याच्या परिसरात पाऊस झाला आहे. तर काही भागात ढगाळ वातावरण असून येथेही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना (Rabi Crops) फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. (Maharashtra News)

Unseasonal Rain
Chatrapati Sambhajinagar : शाळेच्या बोर्डारील छत्रपती संभाजीनगर नावावर लावले काळे; गावात तणाव

पुण्यात अवकाळी पावसाला सुरुवात

हवामान विभगाने पुण्यात पावसाचा (Rain Alert) अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार पुणे शहर व परिसरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. या दरम्यान पुण्यातील मध्यवर्ती आणि उपनगरात पावसाची रिमझिम झाली आहे. यामुळे हवेत देखील गर्व निर्माण झाला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Unseasonal Rain
Sugarcane Crop : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याकडून पंधरा लाख उसाची रोपे; शेतकऱ्यांना अल्पदरात उपलब्ध

बारामती : शहर व परिसरात अवकाळीला सुरुवात
बारामती (Baramati) शहर आणि परिसरात अवकाळी पावसाने सकाळी हजेरी लावली आहे. आज सकाळपासूनच या परिसरात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे सूर्यदर्शन झाले नसून साडेअकरा वाजता आभाळ दाटून आले आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची काहीशी तारांबळ उडाली. दरम्यान या पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर द्राक्ष बागा, फळबागा यावरही विविध रोगांचा प्रादुर्भाव होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

Unseasonal Rain
Ahmednagar Corporation : प्रत्येक चौकात लागणार कर थकबाकीदारांची यादी; अहमदनगर मनपा प्रशासनाचा निर्णय

संभाजीनगर जिल्ह्यात ढगाळ वातावरण 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सकाळपासूनच सगळीकडे ढगाळ वातावरण आहे. बदललेल्या हवामानाचा फटका रब्बी पिकांसोबतच माणसांनाही बसतोय. शेतात असलेले ज्वारी, गहू, हरभरा यासोबत आंबा मोहोर, मोसंबीलाही फ्टका बसण्याची भीती आहे. तर दुसरीकडे हवामानात बदल झाल्याने आजार ही वाढू लागले. आज सकाळपासून सूर्यदर्शन नाही, बदलेल वातावरण आणि गारठा असल्यानं त्रास वाढू लागला आहे.

सातारा जिल्ह्यातील काही भागात पावसाची रिपरीप
सातारा जिल्ह्यात देखील ढगाळ वातावरण निर्माण झाले असून कालपासूनच हवामानात बदल झाल्याने थंडी गायब झाली आहे. दरम्यान काही भागात तुरळक पाऊस झाला असून बदललेल्या वातावरणामुळे स्ट्रॉबेरी फळावर परिणाम होण्याची शेतकऱ्याला आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे गहू, ज्वारी पिकांवर तांबेरा पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com