Karnataka Politics: कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ! कॉंग्रेसला मोठा धक्का, जगदीश शेट्टर यांची भाजपमध्ये घरवापसी

Jagdish Shettar BJP News: जगदीश शेट्टर यांनी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
Karnataka Politics: कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ! कॉंग्रेसला मोठा धक्का, जगदीश शेट्टर यांची भाजपमध्ये घरवापसी
Published On

Karnataka Politics Jagdish Shettar Returned To BJP

कर्नाटकच्या राजकारणात (Karnataka Politics) मोठी खळबळ उडाली आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर भाजपमध्ये परतले आहेत. दिल्लीत त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली. पक्षांर्गत कारणामुळे 68 वर्षीय शेट्टर हे भाजपपासून वेगळे झाले होते. एका वर्षाच्या आत त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केलाय. (latets political news in marathi)

जगदीश शेट्टर यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांची पुन्हा घरवापसी होतेय. कॉंग्रेसला एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसत आहेत.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जगदीश शेट्टर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, पक्षाने मला यापूर्वी अनेक जबाबदाऱ्या दिल्या आहेत. काही कारणांमुळं मी काँग्रेसमध्ये गेलो. गेल्या 8-9 महिन्यांत खूप चर्चा झाल्या. यावेळी भाजपमधील पक्षश्रेष्ठी मला पक्षात परत येण्यास सांगत (Jagdish Shettar Returned To BJP) होते.

जगदीश शेट्टर पुढे म्हणाले, बीएस येडियुरप्पा आणि विजयेंद्र यांनाही मला पुन्हा भाजपमध्ये पाहायचे होते. अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान व्हायचं आहे, या विश्वासानं मी पुन्हा भाजपचा भाग बनत (Karnataka Politics) आहे. अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या एक दिवस आधी त्यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतली होती.

कॉंग्रेससमोर मोठं आव्हान

जगजीश शेट्टर (Jagdish Shettar) यांच्या जाण्यामुळं काँग्रेसला मोठा फटका सहन करावा लागणार आहे. उत्तर कर्नाटक काँग्रेसची स्थिती काहीशी कमकुवत आहे. शेट्टर यांच्यासारखा तगडा नेताही तिथून काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणुकीत पराभूत झाला. यावरून पक्षाच्या कमकुवत स्थितीचा अंदाज येतो. अशा स्थितीत लोकसभा निवडणुकीपूर्वी या भागात आपला जनाधार वाढवणं, हे काँग्रेससमोर कठीण आव्हान आहे.

भाजपला मोठा फायदा

2023 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत तिकीट (Karnataka Politics) न मिळाल्यानं जगदीश शेट्टर यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसने त्यांना हुबळी-धारवाडमधून तिकीट दिलं होतं, मात्र तेथून त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. त्यानंतर पक्षाने त्यांना आमदार केलं. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी उत्तर कर्नाटकात तळागाळात त्यांची चांगली पकड आहे, असं मानलं जातं. ते लिंगायत समाजातील मोठ्या नेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्या भाजपमध्ये प्रवेश झाल्याने या व्होट बँकेचा फायदा भाजपला पुन्हा एकदा मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com