Prayagraj Truck And Bike Accident Saam tv
देश विदेश

Prayagraj Accident : भयंकर! भरधाव टँकरने दुचाकीला उडवलं, एकाच कुटुंबातील ५ जण जागीच ठार; मन सुन्न करणारी घटना

Prayagraj Truck And Bike Accident: प्रयागराजच्या सरयम्मरेज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रस्तीपूर गावात ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला . या अपघातामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी ट्रक जप्त करत चालकाला ताब्यात घेतले आहे.

Priya More

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) प्रयागराजमधून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. रस्ते अपघातामध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रयागराजमध्ये सोमवारी सकाळी हा भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. सरयम्मरेज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रस्तीपूर गावात हा अपघात झाला असून पोलिसांनी ट्रक जप्त करत चालकाला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सरयम्मरेज पोलिस स्टेशन हद्दीतील सोरो पेट्रोल पंपाजवळ सकाळी ६ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. एका टँकरने दुचाकीला चिरडले. दुचाकीवरून पती-पत्नी, दोन लहान मुलं आणि आणखी एक महिला प्रवास करत होते. दुचाकीला धडक दिल्यानंतर हे सर्वजण खाली पडले. त्यानंतर त्यांना ट्रकने चिरडले. या अपघातामध्ये ५ ही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्यू झालेले सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. मृतांमध्ये आईसह दोन मुलांचाही समावेश आहे.

घटनेची माहिती मिळताच सरयम्मरेज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी ट्रक जप्त करत चालकाला ताब्यात घेतले आहे. पोलिस निरीक्षक योगेश प्रताप यांनी सांगितले की, मृत व्यक्ती मीरगंज जैनपूर येथील रहिवासी आहे. अपघाताची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. या अपघातामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्वजण जौनपूर जिल्ह्यातील मीरगंज पोलिस स्टेशन हद्दीतील चौकी खुर्द भागातील रहिवासी होते. लग्नसोहळा आटपून घरी परतत असताना ही घटना घडली. या अपघाताची माहिती मिळताच मृतांच्या नातेवाईकांना घटनास्थळी धाव घेत एकच आक्रोश केला. मृतांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik BJP Leader Case: ‘मामा राजवाडे’च्या टोळीचा माज खल्लास! भाजप नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

'त्यांनी माझा हात पकडून मला..', गोविंदाबाबत अभिनेत्रीचा मोठा खुलासा; नेमकं काय म्हणाली?

Box office collection: 'कंतारा चॅप्टर १' ने रविवारी केली बंपर कमाई; 'सनी संस्कार...'निघाला फुसका बार

Maharashtra Live News Update : ऐन दिवाळीत पावसाची शक्यता

Tea drinking habit: चहाचे शौकीन असाल तर 'ही' चूक अजिबात करू नका; कॅन्सरचा धोका असल्याचं संशोधकांचं मत

SCROLL FOR NEXT