Shocking : संभाजीनगर हादरलं! रक्ताच्या थारोळ्यात गळा चिरलेल्या अवस्थेत आढळली १७ वर्षीय तरुणी; नेमकं काय घडलं?

Sambhajinagar 17 years Vaishnavi Killed : संभाजीनगरमध्ये १७ वर्षीय बारावीच्या विद्यार्थिनीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाळूज पोलीस व फॉरेन्सिक पथकाकडून घटनेचा कसून तपास सुरू आहे.
Shocking : संभाजीनगर हादरलं! रक्ताच्या थारोळ्यात गळा चिरलेल्या अवस्थेत आढळली १७ वर्षीय तरुणी; नेमकं काय घडलं?
Sambhajinagar Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • संभाजीनगर जिल्ह्यात १७ वर्षीय विद्यार्थिनीची निर्घृण हत्या

  • आई-वडील घराबाहेर असताना तरुणी घरात एकटी होती

  • रक्ताच्या थारोळ्यात गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

  • घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर, गावात भीतीचे वातावरण

संभाजीनगरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. बारावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. वैष्णवी संतोष निळ असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत असून तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून एका संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने तरुणीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातल्या मुरमी गावात वैष्णवी तिच्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. ती वाळूज येथील विद्यालयात बारावीमध्ये होती. मृत वैष्णवीचे वडील संतोष यादव निळ हे व्यवसायिक आहेत. शुक्रवारी दुपारी १२:०० च्या सुमारास वैष्णवी घरी आली. तीचे वडील हे कामासाठी बाहेर गेले होते, तर आई मथुरा शेतात कामाला गेलेली होती. वैष्णवीचा भाऊ प्रीतेष हा सकाळी शाळेत गेलेला होता. दरम्यान, महाविद्यालयातून आलेली वैष्णवी घरात एकटीच होती. दुपारी संतोष नीळ यांनी पत्नी मथुरा यांना फोन करून वैष्णवीला रक्ताच्या उलट्या होत असल्याचे सांगितले. तेव्हा मथुरा व इतर नातेवाइकांनी घरी धाव घेतली.

Shocking : संभाजीनगर हादरलं! रक्ताच्या थारोळ्यात गळा चिरलेल्या अवस्थेत आढळली १७ वर्षीय तरुणी; नेमकं काय घडलं?
Pune : “आम्ही इथले भाई” कोयत्याने वाहनांची तोडफोड करणाऱ्या तरुणांची पोलिसांनी जिरवली

तेव्हा त्यांना वैष्णवी खाटेजवळ रक्ताच्या थारोळ्यात गळा चिरलेल्या अवस्थेत पडलेली आढळली. तिला तत्काळ बाहेर ओसरीत आणण्यात आले. मात्र त्या आधीच वैष्णवीने शेवटचा श्वास घेतला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून वैष्णवीचा मृतदेह रुग्णालयात हलवला. याप्रकरणी वैष्णवीच्या आईच्या फिर्यादीवरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Shocking : संभाजीनगर हादरलं! रक्ताच्या थारोळ्यात गळा चिरलेल्या अवस्थेत आढळली १७ वर्षीय तरुणी; नेमकं काय घडलं?
Sunday Mega Block : रविवारी मुंबईकरांचे 'मेगा'हाल होणार, ३ मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या रेल्वेचे वेळापत्रक

दरम्यान या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, वाळूज पोलिसांनी घटनास्थळी श्वान व फॉरेन्सिक पथकाला घटनेची माहिती दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी साक्षीदारांची माहिती घेतली, आई-वडील घरी नसताना तिच्यासोबत नेमकं काय घडलं, याचा तपास पोलिस करत आहेत. वैष्णवीची हत्या नेमकी कशी झाली? याचं अद्याप कारण समोर आलेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com