Hathras Ratibhanpur Satsang Stampede News24
देश विदेश

Uttar Pradesh Hathras: हाथरसमधील भोले बाबांच्या सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी; ५० ते ६० जणांचा मृत्यू, मृतांमध्ये २५ महिलांचा समावेश

Hathras Ratibhanpur Satsang Stampede: सत्संग चालू असताना अचानक चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळालीय. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.

Bharat Jadhav

उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये सत्संगाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झालीय. रितभानपूर गावात भोले बाबा यांच्या सत्संगाचा कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली. माहिती एटाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी उमेश त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत ५० ते ६० जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताची दखल घेत चौकशीचे आदेश दिलेत. ADG आग्रा आणि अलिगडच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तपास पथक तयार करण्यात आले आहे. ठार झालेल्यांमध्ये २५ महिला असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस दल आणि प्रशासनाचे अधिकारी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. जखमी महिला, मुले आणि पुरुषांना बेशुद्ध अवस्थेत एटा, अलीगड, सिकंदरराव रुग्णालयात नेण्यात आलंय. हाती आलेल्या माहितीनुसार, सत्संगाच्या मंडपात प्रचंड उकाडा जाणावत होता आणि आर्द्रतेमुळे चेंगराचेंगरी झाली. दरम्यान पोलीस प्रशासन आणि रुग्णवाहिका घटनास्थळी उशिरा पोहोचलीय.

लखनऊमधील कोणत्याही प्रमुख जबाबदार अधिकाऱ्याने अद्याप कोणतीही अपडेट दिलेली नसली तरी मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, २७ लोकांचे मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केलाय. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला गती देण्याच्या सूचना दिल्यात. जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात.

तसेच जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच आयोजन मंडळासह स्थानिक प्रशासनावर कारवाई करण्यात यावं असं सांगण्यात यावं. या संपूर्ण घटनेचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाकडून मागवण्यात आलाय. चेंगराचेंगरीला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत.

आधी एटाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी उमेश त्रिपाठी यांनी २७ जणांचा मृूत्यू झाल्याची माहिती दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, सिकंदराऊ कोतवाली येथील एका गावात भोलेबाबा यांचं प्रवचन होतं. या कार्यक्रमासाठी साधारण २० हजार भाविक आले होते. या गर्दीमुळे भाविक त्रासले होते. गर्दी आणि उन्हामुळे लोक बेहोश होऊन खाली पडले, हे पाहून लोकं घाबरले आणि मंडपाच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले. त्याचदरम्यान चेंगराचेंगरी झाली. जेव्हा लोक जमिनीवर पडले तेव्हा इतर लोक त्यांना चिरडून पुढे जात होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाने शेकडो गंभीर लोकांना रुग्णालयात दाखल केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT