Uttar Pradesh Shocking News  Saam Tv
देश विदेश

Shocking: ३ सख्ख्या बहिणींच्या सामूहिक आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, 'ती' डायरी सापडली; शेवटच्या पानातून सत्य उघड

Ghaziabad 3 Sisters End Life Diary Reveals Truth: गाझियाबादमध्ये ३ सख्ख्या बहिणींनी आत्महत्या केली होती. मध्यरात्री २ वाजता इमारतीच्या ९ व्या मजल्यावरून त्यांनी उड्या मारत आयुष्य संपवलं. या आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय...

Priya More

Summary -

  • उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये ३ सख्ख्या बहिणींनी आत्महत्या

  • घटनास्थळी सापडलेल्या डायरीतून धक्कादायक सत्य उघड

  • ऑनलाइन गेम किंवा सुसाइड चॅलेंजचा कोणताही पुरावा नाही

  • डिजिटल व्यसन, एकटेपणातून आत्महत्या केल्याचे उघड

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये ३ सख्ख्या बहिणींनी सामूहिक आत्महत्या केली. या तिघींनी इमारतीच्या ९ व्या मजल्यावरून उडी मारत आयुष्य संपवलं. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे. या आत्महत्या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे. या मुलींच्या आत्महत्येनंतर त्यांनी लिहिलेली एक डायरी सापडली. या डायरीमध्ये त्यांनी आत्महत्येमागचं कारण लिहिले आणि वडिलांची माफी देखील मागितली आहे.

कोरियन संस्कृतीची सवय -

या अल्पवयीन बहिणींच्या आत्महत्येमागे ऑनलाईन कोरियन लव्हर गेम असल्याचे बोलले जात होते. पण पोलिस तपासातून ही आत्महत्या कोणत्याही ऑनलाइन गेमच्या टास्कमुळे झाली नाही. तर या मुलींच्या आई-वडिलांनी त्यांच्या मोबाइल फोन वापरावर बंदी घातली. त्या डिजिटल जगापासून दूर गेल्या, कोरियन संस्कृतीच्या सवयीमुळे आणि मानसिक ताणामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे.

डिजिटल कंटेटचे व्यसन -

पोलिस तपासात आतापर्यंत कोणत्याही कोरियन लव्ह गेम किंवा ऑनलाइन सुसाइड चॅलेंजचे कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत. मोबाइल फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. या मोबाइल फोन आणि डायरीच्या पानांवर लिहिलेल्या गोष्टी यातून थेट आत्महत्येस प्रवृत्त करणारा कोणताही गेम किंवा टास्कचा उल्लेख केला नाही. हे ऑनलाइन गेमिंग टास्कचे प्रकरण नाही. तर डिजिटल कंटेटचे व्यसन आणि त्यापासून अचानक दूर गेल्यामुळे आलेला मानसिक त्रास स्पष्ट दिसून येत आहे.

कोरियन संस्कृतीची आवड -

पोलिसांना घटनास्थळावर एक ८ पानांची डायरी सापडली. या डायरीत आत्महत्या केलेल्या मुलींनी आपले विचार लिहिले होते. त्यांनी या डायरित स्पष्ट लिहिले होते की, त्यांच्यावर कोरियन संस्कृतीचा खोलवर प्रभाव पडला होता आणि त्यापासून दूर राहणे त्यांच्यासाठी अवघड झाले होते. या डायरीत कोरियन संस्कृती, के-पीओपी, कोरियन संगीत, कोरियन चित्रपट, कोरियन लघुपट, कोरियन शो आणि कोरियन मालिका यांचा सतत उल्लेख केला आहे. या डायरित लिहिले आहे की, आम्हाला कोरियन कल्चर खूप आवडते. या मुलींना फक्त आवड किंवा छंद नव्हता तर हळूहळू त्यांना एक प्रकारचे व्यसन लागले होते.

मोबाइल वापरावर बंदी -

सतत मोबाइलचा वापर करतात त्यामुळे या मुलींच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाइल वापरावर बंदी घातली होती. मुलींनी याबाबत डायरीमध्ये नाराजी देखील व्यक्त केली आहे. मोबाइल फोन बंद असल्यामुळे त्या खूप दु:खी होत्या आणि त्यांना एकटे पडल्यासारखे वाटत होते असे त्यांनी डायरीत लिहिले होते. या तिन्ही मुली डिजिटल जगात भाविक आधार शोधत होत्या. त्यांचे मोबाइल बंद झाल्यानंतर त्यांचे संपूर्ण जग जे त्यांना वास्तविक जग वाटू लागले होते.

खूप एकटं वाटतंय -

या मुलींपैकी एकीने घराच्या भिंतीवर इंग्रजीत लिहिले होते की, 'मी खरोखरच खूप एकटी पडली आहे. माझे आयु्ष्य खूप एकटं झाल्यासारखे वाटत आहे.' कोरियन संस्कृतीपासून वेगळं होणं हे त्यांना सहन होत नव्हते. त्या कोरियन संस्कृतीशी भावनिकदृष्ट्या जोडल्या गेल्या होत्या. पण त्यापासून दूर जाणं हे त्यांना खूप जड जात होते. त्यामुळे त्यांना एकटेपणा वाटू लागला होता. घरात सर्वजण असताना देखील त्यांना खूप एकटे वाटायचे. यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

कोरोनापासून शाळेत जाणं बंद -

तपासातून अशी देखील माहिती समोर आली की, कोरोना काळापासून या तिन्ही मुली शाळेत जात नव्हत्या. मुली अभ्यासात हुशार नव्हत्या, कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नव्हती त्यामुळे त्यांचे शिक्षण थांबले होते. शाळेपासूनचे अंतर आणि मर्यादित सामाजिक वर्तुळामुळे मुलींचे जग हळूहळू त्यांच्या घरामध्ये आणि मोबाइलमध्ये मर्यादित झाले. या मुली जास्त घराबाहेर जात नव्हत्या आणि त्या अनेकदा त्यांच्या खोलीमध्येच राहायच्या. त्या तिघीही दिवसभरातील सर्व कामं एकत्रच करायच्या. एकत्र जेवायच्या आणि एकत्र झोपायच्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : सोने खरेदीदारांच्या खिशाला कात्री, सलग चौथ्या दिवशी दरवाढ; आजचा ताजा भाव काय?

Maharashtra News Live Update: कृषी शिक्षणात महाराष्ट्र पडला मागे... राष्ट्रीय मानांकन यादीतून राहुरी कृषी विद्यापीठ ' आऊट '

Paper Leak: मोदींची 'फास्ट ट्रॅक कोर्ट'ची घोषणा, राहुल गांधींचा पलटवार; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासह केल्या 'या' ३ मोठ्या मागण्या

ITR Filing 2026: 31 जुलैपर्यंत ITR भरला नाही तर मोठा आर्थिक फटका; प्रत्येक करदात्याने ही बातमी एकदा वाचाच

Bollywood Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध अभिनेत्री चढली बोहल्यावर; नवऱ्यासाठी केली खास पोस्ट, पाहा लग्नाचे PHOTOS

SCROLL FOR NEXT