Chunar Train Accident Saam Tv
देश विदेश

Train Accident: भयंकर रेल्वे अपघात! धावत्या ट्रेनने ६ जणांना चिरडलं, रेल्वे रूळावर रक्ताचा सडा अन् मृतदेहाचे तुकडे

Chunar Train Accident: उत्तर प्रदेशमध्ये भयंकर रेल्वे अपघात झाला. चुनार रेल्वे स्टेशनजवळ ६ भाविकांना ट्रेनने धडक दिली. या अपघातामध्ये सर्वांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेहांचे तुकडे तुकडे झाले.

Priya More

Summary -

  • मिर्झापूरच्या चुनार रेल्वे स्टेशनवर भीषण रेल्वे अपघात

  • भरधाव हावडा-कालका एक्स्प्रेसने ६ भाविकांना चिरडलं

  • मृतदेहाचे तुकडे पडल्याने ओळख पटवणं कठीण झालं

  • कार्तिक पौर्णिमेनिमित्त असलेल्या यात्रेदरम्यान घडलेली ही दुर्घटना आहे

उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमधील चुनार रेल्वे स्टेशनवर भयंकर रेल्वे अपघात झाला. भरधाव ट्रेनने काही भाविकांना धडक दिली. या अपघातामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला. रेल्वे रूळ ओलांडत असताना हावडा- कालक एक्स्प्रेसने या सर्वांना चिरडलं. हा अपघात इतका भीषण होता की मृतदेहांचे तुकडे तुकडे झाले. मृतांची ओळख पटवणं देखील कठीण झाले आहे. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या चुनार रेल्वे स्टेशनवर आज सकाळी ही घटना घडली. काही भाविक कार्तिक पौर्णिमेनिमित्त गंगास्नान करण्यासाठी यात्रा करत होते. हे भाविक चुनार रेल्वे स्थानकावर ट्रेनमधून उतरून चुकीच्या दिशेने जात असल्यामुळे त्यांना ट्रेनने धडक दिली. भरधाव हावडा- कालका एक्स्प्रेसने त्यांना धडक दिली. अपघातामध्ये सहाही जणांचा जागीच मृत्यू झाला. रेल्वे रुळावर रक्ताचे सडे आणि मृतदेहांचे तुकडे तुकडे पडले आहेत.

या रेल्वे अपघातानंतर चुनार रेल्वे स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस सध्या या अपघाताचा तपास करत आहेत. स्थानिक रेल्वे प्रशासनाने भाविकांना रेल्वे ट्रॅकवरून चालत जाऊ नका असे आवाहन केले आहे. कार्तिक पौर्णिमेच्या यात्रेदरम्यान ही मोठी दुर्घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनभद्रहून येणारी गोमोह-प्रयागराज बरवाडीह पॅसेंजर ट्रेन सकाळी ९.१५ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर आली. कार्तिक पौर्णिमेच्या स्नानासाठी हे भाविक चुनारला आले होते. प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर उतरल्यानंतर त्यांनी विरुद्ध दिशेने प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. याचवेळी ट्रेनने त्यांना धडक दिली.

दरम्यान, मंगळवारी छत्तीसगडमधील बिलासपूर येथे एक मोठा रेल्वे अपघात झाला. गेवरा रोड-बिलासपूर मेमू ट्रेन जयराम नगरजवळ एका मालगाडीला धडकली. ही ट्रेन मालगाडीवर चढली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. या अपघातामुळे रेल्वे रूळाचे मोठे नुकसान झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT