भीषण रेल्वे अपघात! पेसेंजर ट्रेनचा डब्बा थेट मालगाडीवर, दुर्घटनेचे थरारक फोटो व्हायरल

Bilaspur Major Train Accident : छत्तीसगडमधील बिलासपूर येथे एक मोठा रेल्वे अपघात झालाय. गेवरा रोड-बिलासपूर मेमू ट्रेन जयराम नगरजवळ एका मालगाडीला धडकली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झालेत.
Bilaspur Major Train Accident
Passenger MEMU train collides with a goods train in Bilaspur, Chhattisgarh; rescue teams rush to the spot as visuals go viral.saam tv
Published On
Summary
  • ही दुर्घटना गटोरा आणि बिलासपूर स्टेशनदरम्यान झालीय.

  • या रेल्वे अपघातात ६ जणांचा मृत्यू झालाय.

  • रेल्वे प्रशासनाने बचाव कार्य सुरू केलंय.

छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातील एका मोठा रेल्वे अपघात घडलाय. मंगळवार संध्याकाळी जयराम नगर स्टेशनजवळ गेवरा रोड बिलासपूर (6873) मेमू लोकल ट्रेन आणि एका मालगाडीची समोरासमोर धडक झालीय. ही दुर्घटना गटोरा आणि बिलासपूर स्टेशनदरम्यान अप लाइनवर झाला.

हाती आलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झालाय तर २ ते ३ जण जखमी झालेत. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने बचाव आणि मदत कार्य सुरू केलं. घटनास्थळी वरिष्ठ रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी पोहचले असून त्यांनी बचाव कार्य सुरू केलंय.

Bilaspur Major Train Accident
Shocking: धावत्या ट्रेनमध्ये जवानाची हत्या, कोच अटेंडेंटने चाकूने सपासप वार करत...

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातामुळे अप लाइनवरील रेल्वे वाहतूकीवर परिणाम झालाय. पूर्ण वाहतूक विस्कळीत झालीय. रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलंय. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. हा रेल्वे अपघात कशामुळे झाला याचे कारण शोधले जात आहे. घटनास्थळी मोठ्या संख्येने स्थानिक रहिवासी आणि बचाव पथके दाखल झाली आहेत.

Bilaspur Major Train Accident
थराररक! शांतपणे एका बाजूला उभा राहिला, अचानक खिशातून बंदूक काढली अन् धाडधाड विद्यार्थिनीवर गोळ्या झाडल्या, VIDEO

गाटोरा आणि बिलासपूर स्थानकांदरम्यान दुपारी ४ वाजताच्या सुमारास हा अपघात घडल्याचे सांगितलं जात आहे. हा अपघात झाल तेव्हा संपूर्ण परिसर आवाजाने दणाणून गेला. मोठा आवाज झाल्यानंतर तेथील स्थानिक लोक घटनास्थळी गेले आणि त्यांनी बचाव कार्य सुरू केलं. दोन्ही रेल्वेंची समोरासमोर धडक झाली. धडकेनंतर प्रवासी रेल्वेचा एक डबा मालगाडीवर चढला. अनेकजण जखमी झालेत. बचाव पथकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com