Meerut News Saam Tv
देश विदेश

Meerut News: गंगा नदीत स्नान करण्याची इच्छा अपूर्णच राहिली; हरिद्वारला जाणाऱ्या कारला अचानक आग, ४ जणांचा होरपळून मृत्यू

Car Caught Fire In Meerut: मेरठमध्ये रविवारी रात्री अचानक एका कारला भीषण आग लागली होती. या आगीत ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मेरठमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी रात्री मेरठमधील एका कारने अचानक पेट घेतला. या आगीत कारमधील ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना गंगानहर कंवर ट्रॅकवर घडली आहे.

घडलेल्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहचली. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.परंतु तोपर्यंत ही कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या कारमधील लोक गंगा स्नान करण्यासाठी हरिद्वारला जात होते.

या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. मृत्यू झालेल्या लोकांचा चेहरा पूर्णपणे जळाला आहे. त्यामुळे त्यांची ओळख पटणे कठीण झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली आहे. याबाबत देहाटचे एसपी कमलेश बहादुर सिंग यांनी सांगितले की, रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. आग लागलेली कार सीएनजी होती.

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. यामुळे मृतांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. पोलिस कारच्या नंबर प्लेटवरुन ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहे.

ही कार हरिद्वारच्या दिशेने जात होती. कारला रस्त्याच्या मधोमध आग लागली. आजूबाजूच्या लोकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. ही आग कशामुळे लागली यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. सिलेंडर लिकेज किंवा स्फोटामुळे कारला आग लागली असावी, असं प्रथमदर्शनी समजत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा नागपुरात नागरी सत्कार सोहळा

Son Of Sardaar 2 : ॲक्शन अन् कॉमेडीचा तडका, अजय देवगनचा 'सन ऑफ सरदार २' ओटीटीवर कुठे पाहता येणार?

Honda Bike: होंडाने लाँच केली स्वस्त बाईक; Hero Xtreme ला जबरदस्त स्पर्धा, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Cyber Crime News : टेलिग्रामवर नोकरीचं आमिष दाखवून ६ लाखांची फसवणूक; मुंबईतील धक्कादायक घटना

Kumbha Rashi : कुंभ राशीचे भाग्य आज उजळणार, गरिबी होणार दूर वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT