BJP leader and former minister Nanak Ram Bhurji died following a fall from the Darulshafa MLA residence complex in Lucknow's Hazratganj area. saam tv
देश विदेश

मोठी बातमी! आमदार निवासाच्या 7व्या मजल्यावरून पडून भाजपच्या माजी मंत्र्याचा मृत्यू; राजकीय वर्तुळात खळबळ

Former BJP Minister Nanak Ram Bhurji Dies : भाजप नेते आणि माजी मंत्री नानक राम भुर्जी यांचा इमारतीवरून पडून मृत्यू झालाय. घटना लखनऊच्या हजरतगंज भागातील दारुलशफा नवीन आमदार निवास संकुलात घडली आहे.

Bharat Jadhav

  • आमदार निवासातून पडून भाजपच्या माजी मंत्र्याचा मृत्यू

  • नानक राम भुर्जी यांच्या मृत्यूची बातमी

  • दारुलशफा आमदार निवासातील धक्कादायक घटना

उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक घटना घडलीय. आमदार निवासाच्या इमारतीच्या ७ व्या मजल्यावरून पडून भाजप नेते आणि माजी मंत्र्याचं निधन झालंय.नानक राम भुर्जी असं भाजप नेत्याचं नाव आहे. हजरतगंज भागातील 'दारुलशफा' नवीन आमदार निवास संकुलाच्या एका मजल्यावरून भाजप नेते भुर्जी खाली पडले असून जागीच त्यांचा मृत्यू झाला. (Former Bjp Minister Dies After Fall From Mla Residence Building In Lucknow)

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, ६८ वर्षीय भुर्जी हे माजी राज्यमंत्री होते. आमदार निवास संकुलाच्या प्रभारी अधिकाऱ्याने स्थानिक पोलिसांना सांगितले की, आमदारांच्या निवास इमारतीच्या मागील बाजूच्या एक मजल्यावरून पडल्याचं सांगितलं. माहिती मिळताच पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

पहिल्या मजल्यावरून खाली पडलेला व्यक्ती माजी मंत्री भाजप नेते भुर्जी असल्याची पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी भुर्जी यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान त्याच्या कुटुंबीयांना ही दुखद बातमी देण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: लांब, दाट आणि सिल्की केस हवे आहेत? तांदळाच्या पाण्याचा असा करा योग्य वापर

Maharashtra News Live Update: तरूण आपल्या देशाचे भविष्य आहेत, तरी तरुणांवर हल्ला का? - प्रियंका गांधी

Mumbai Water Cut : मुंबईकरांवर पाणी संकट! पुढील २ दिवस १५ टक्के अतिरिक्त पाणीकपात लागू; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Liver Health : सावधान! रोजच्या या सवयी तुमचे लिव्हर शांतपणे करत आहेत निकामी; वेळीच ओळखा धोका

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी 5 मिनिटांत बनवा कुरमुरा भेळ

SCROLL FOR NEXT