Uttar Pradesh Crime Saam Tv
देश विदेश

Shocking: बंद घरामध्ये आढळले चौघांचे मृतदेह, दरवाजा तोडताच आतमधील दृश्य पाहून पोलिसही हादरले

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये एका घरामध्ये चौघांचे मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली. हे सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. मृतांमध्ये नवरा-बायको आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.

Priya More

Summary -

  • मुझफ्फरनगरमध्ये एकाच कुटुंबातील ४ जण मृतावस्थेत आढळले

  • पतीने बायको आणि मुलांची हत्या करून आत्महत्या केल्याचा संशय

  • घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर घटना उघड

  • पोलिस आणि फॉरेन्सिक टीमकडून तपास सुरू

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. याठिकाणी एका घरामध्ये चौघांचे मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. हे सर्वजण एकाच घरातील आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौघांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळाची कसून तपासणी केली. मृतांमध्ये नवरा-बायको आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सरवत परिसरात एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाल्याच्या बातमीने परिसरात एकच खळबळ उडाली. मृतांमध्ये इरशाद (३२ वर्षे), त्याची बायको नूरीन (२५ वर्षे), एक महिन्याची मुलगी अक्सा आणि दोन वर्षांचा मुलगा अहिल यांचा समावेश आहे. इरशादचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तर इतर तिघांचे मृतदेह जमिनीवर पडलेले होते.

इरशादने ईदच्या दिवशी आपल्या विवाहित बहिणीला १,५०० रुपयांची भेट दिली होती. बहिणीला पैसे दिल्याचे कळताच इरशादची बायको नूरीन त्याच्यासोबत वाद घालू लागली. दोघांमध्ये रात्री उशीरापर्यंत कडाक्याचे भांडण सुरू होते. त्यानंतर रागाच्या भरात इरशादने बायको आणि आपल्या दोन मुलांची हत्या केली आणि स्वत: गळफास घेत आत्महत्या केली.

दुसऱ्या दिवशी जेव्हा इरशादच्या घराचा दरवाजा उघडला नाही तेव्हा सर्वजण घाबरले. इरशादच्या भावाने जेव्हा घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा त्यांना इरशाद गळफास घेतलेल्या अवस्थेत आणि त्याची बायको आणि दोन मुलं जमिनीवर मृतावस्थेत पडलेले आढळून आले. घरातील हे दृश्य पाहून सर्वजण प्रचंड घाबरले.

पोलिसांनी सांगितले की, इरशादने आधी आपल्या बायको आणि मुलांना विष देऊन त्यांची हत्या केली. त्यानंतर त्याने आत्महत्या केली. चारही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. अहवाल मिळाल्यानंतरच चौघांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. घरातील एका खोलीत चार जणांचे मृतदेह आढळले होते. फॉरेन्सिक टीम या प्रकरणाचा तपास करत आहे. पती-पत्नीमध्ये ईदीच्या पैशांवरून वाद सुरू होता. पोलिस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून नेमकं कारण समोर येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; म्हाडाचे अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवली, कारण काय?

Milk Price Hike: सर्वसामान्यांना मोठा झटका! अमूल अन् मदर डेअरीचे दूध महागले, नवे दर किती?

bridge collapse : मोठा अनर्थ टळला! डंपरच्या भारानं जुना पूल कोसळला, सुधागडमधील दुर्घटना

पुण्यानंतर मुंबईत खळबळ; CSMT, BMC वर संशयास्पद ड्रोन; नागरिक भयभीत

PM मोदींच्या आवाहनाला मंत्र्यांचा ठेंगा; मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कधी कमी होणार?

SCROLL FOR NEXT