Crime in Oyo Rooms Saam TV
देश विदेश

Crime in Oyo Rooms : विवाहित महिला प्रियकराला भेटण्यासाठी Oyo मध्ये गेली; तिच्यासोबत जे घडलं ते ऐकून तुमच्याही अंगाचा थरकाप उडेल

साम टिव्ही ब्युरो

Uttar Pradesh : उत्तर प्रदेश येथून एक मोठी धक्कादायक घटना समोर आली आहे. एक विवाहित महिला तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी Oyo मध्ये पोहचली होती. तिथे गेल्यावर या महिलेची हत्या करण्यात आली आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी प्रियकराला ताब्यात घेतलं आहे. तसेच महिलेचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. (Crime News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सदर घटना शुक्रवारी रात्री १२.३० च्या सुमारास घडली. सेक्टर ६३ येथील एका Oyo हॉटेलवर महिला तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी गेली होती. यावेळी एका मुद्दयावरून या दोघांमध्ये मोठा वाद पेटला.

या वादामध्ये प्रियकराने महिलेला मारहाण करण्यास सुरूवात केली. मारहाण करताना तोंडावर आणि डोक्यावर जोरात घाव केल्याने महिलेचा यात जागीच मृत्यू झाला.

दोन मुलांची आई असूनही केलं हे कृत्य

सदर महिलेला दोन लहान मुलं देखील आहेत. मात्र तरी देखील तिचे पती व्यतिरिक्त अन्य एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. या घटनेबाबत पतीला थोडी कल्पना आली होती. त्यामुळे पतीने तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला.

मात्र महिला काहीही ऐकण्यास तयार नव्हती. शेवटी तिच्या प्रियकरानेच तिची हत्या केली. पत्नीची हत्या झाल्याची माहिती समजताच पतीने प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रूपाली चाकणकर यांच्याप्रती केलेली कौतुकाची पोस्ट अजित पवारांनी केली डिलीट

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

SCROLL FOR NEXT